MHT-CET 2021: महाराष्ट्र CET परीक्षेच्या वेळापत्रकात बदल Rojgar News

MHT-CET 2021: महाराष्ट्र CET परीक्षेच्या वेळापत्रकात बदल Rojgar News

2021: महाराष्ट्र सीईटीच्या प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ५ परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता या परीक्षा ३ ऑक्टोबर ऐवजी ८ ऑक्टोबर रोजी घेण्यात येतील. राज्य कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलने महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्टचे () चे सुधारित वेळापत्रकही जाहीर केले आहे. आयआयटी मुंबईकडून यासंदर्भात विनंती प्राप्त झाल्यानंतर परीक्षांच्या तारखा बदलण्याचा निर्णय राज्य घेण्यात आला. यावर्षी महाराष्ट्र सीईटीसाठी एकूण ८ लाख ५५ हजार ८६९ विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यात आले आहेत. ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ५ परीक्षांच्या तारखा २०२१ या परीक्षेच्या दिवशी येत होत्या. परीक्षा केंद्रांच्या अभावामुळे परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, ३ ऑक्टोबर रोजी होणारी २०२१ परीक्षा आता ८ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. या संदर्भात ताज्या अपडेटसाठी विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर महाराष्ट्र चाचणी सेलच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या एमएचटी सीईटी २०२१ च्या ५ परीक्षांमध्ये बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी/बी प्लॅनिंग, मास्टर्स ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ एज्युकेशन आणि मास्टर्स ऑफ एज्युकेशन (तीन वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स), बॅचलर ऑफ लॉ (पाच वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स) आणि बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन या परीक्षांचा समावेश आहे. या परीक्षा ८ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त, MHT CET 2021 च्या उर्वरित परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. यासाठी, राज्य कक्षाने विद्यापीठे आणि संस्थांना परीक्षांच्या अद्ययावत तारखांनुसार त्यांचे वेळापत्रक आखण्याचे आवाहन केले आहे. २२६ केंद्रावर परीक्षा मागील वर्षी सीईटीसाठी एकूण १९८ परीक्षा केंद्रे होती. यंदा कोविड -१९ संक्रमण स्थितीच्या पार्श्वभूमीवर या केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यंदा २२६ केंद्रांवर सीईटी परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे. यासाठी एकूण ५० हजार संगणक राज्यभर सज्ज आहेत, मात्र कोविडचं बंधन असल्यामुळे २५ हजार संगणकांचाच परीक्षेसाठी वापर होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची नियमावली पाळून ही परीक्षा घेतली जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3koSzml
via nmkadda

0 Response to "MHT-CET 2021: महाराष्ट्र CET परीक्षेच्या वेळापत्रकात बदल Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel