Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २३, २०२१ WIB
Last Updated 2021-09-23T14:44:37Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

केडीएमसीमध्ये विविध पदांची भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड Rojgar News

Advertisement
KDMC Recruitment 2021: कल्याण डोंबिवली महापालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. केडीएमसीतर्फे करोना प्रतिबंध अंतर्गत कंत्राटी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांना करोना चाचणीची सेवा देण्यासाठी आरटीपीसीआर, प्रयोगशाळेकरीता मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. या भरतीअंतर्गत एकूण २६ पदे भरली जाणार आहेत. मायक्रो बायोलॉजिस्ट, सेंटर हेड कम क्वालिटी मॅनेजर, सिनिअर टेक्निशिअन, ज्युनिअर टेक्निशिअन ही पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. मायक्रो बायोलॉजिस्ट पदाची १ जागा भरण्यात येणार आहे. यासाठी उमेदवाराकडे एमडी मायक्रो किंवा एमडी पॅथची पदवी असणे गरजेचे आहे. खुल्या प्रवर्गातून ही जागा भरली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारास ८५ हजार पगार देण्यात येणार आहे. सेंटर हेड कम क्वालिटी मॅनेजरचे एक पद भरले जाणार आहे. या पदासाठी उमेदवाराकडे एमएससी/बीएससी (मायक्रोलॉजी) तसेच RTPCR लॅबमधील १ वर्षाचा कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. ही भरती खुल्या प्रवर्गातून होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ३५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. सिनिअर टेक्निशिअन पदाच्या १२ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराकडे बीएससी, डीएमएलटी आणि १ वर्षाचा आरटीपीसीआर लॅबमधील अनुभव असणे गरजेचे आहे. खुल्या प्रवर्गातील ५ आणि राखीव प्रवर्गातून ७ जागा भरण्यात येणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना ३० हजार दरमहा पगार दिला जाईल. ज्युनिअर टेक्नशियन पदाच्या १२ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराकडे बीएससी, डीएमएलटीचे शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे. खुल्या प्रवर्गातील ५ आणि राखीव प्रवर्गातून ७ जागा भरण्यात येणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना २२ हजार ५०० रुपये दरमहा पगार दिला जाईल. मुलाखतीदिवशी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय प्रवर्गासाठी यामध्ये ४३ वर्षांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. उमेदवारानी ३० सप्टेंबर रोजी आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महापालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प) या पत्त्यावर मुलाखतीसाठी यायचे आहे.सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत उमेदवारांची नोंदणी आणि मुळ कागदपत्रांची छाननी, तपासणी होईल. त्यानंतर २ ते ५.३० या वेळेत पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. पदभरतीसंदर्भात इतर महत्वाचा तपशील जाहिरातीमध्ये असून त्याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XWIcOa
via nmkadda