Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०३, २०२१ WIB
Last Updated 2021-09-03T07:43:26Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचे आदेश Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई आयआयटी, एनआयटीसारख्या देशातील नामांकित शिक्षण संस्थांबरोबरच केंद्रीय विद्यापीठांमधील एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सर्व शिक्षण संस्थांना पत्र पाठवले आहे. देशातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. याबाबत लोकसभेच्या अधिवेशनात माहिती समोर आली होती. त्यावरून देशभरातून टीकेची झोड उठली होती. यानंतर केंद्रीय उच्च शिक्षण विभागाचे सचिव अमित खरे यांनी याबाबत सर्व संस्थांना पत्र लिहिले आहे. यामध्ये या प्रवर्गांतील सर्व रिक्त जागा भरण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी ५ सप्टेंबर, २०२१ ते ४ सप्टेंबर, २०२२ असा कालावधी देण्यात आला आहे. या सर्व प्रवर्गांतील रिक्त पदांवरील जागा भरण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. याचबरोबर ही पदभरती करण्यासाठी कोणता कृती आराखडा तयार करणार याची माहिती शिक्षण संस्थांकडून मागितली आहे. यामध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२मध्ये रिक्त पदांचा तपशील, या पदांच्या भरतीबाबत वित्त समिती, नियामक मंडळ, व्यवस्थापन मंडळाच्या बैठकींत चर्चा झालेला तपशील सादर करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय या भरतीबाबत महिनाभरात केलेल्या कार्यपद्धतीचा अहवाल सादर करण्याची सूचना या पत्रात करण्यात आली आहे. राज्यानेही 'मिशन मोड'वर यावे राज्यातील विविध अनुदानित कॉलेजे आणि विद्यापीठांमध्ये नऊ हजार ५११ पदे रिक्त आहेत. याबाबत विविध संघटनांनी आंदोलन करून ही पदे भरण्याची मागणी केली होती. याबाबत 'मटा'नेही वेळोवेळी पाठपुरावा केला होता. यानंतर सरकारने ३ नोव्हेंबर २०१८ रोजी ४० टक्के म्हणजे तीन हजार ५८० पदांच्या भरतीला मंजुरी दिली होती. मात्र यातील अवघ्या ७०० पदांच्याच जाहिरात्या आल्या आहेत. त्यानंतर ही प्रक्रिया थांबली आहे. आता करोनामधून आपण बाहेर पडत आहोत. अशावेळी राज्य सरकारनेही या सर्व पदांच्या भरतीसाठी विशेष मोहीम हाती, घ्यावी अशी मागणी ऑल इंडिया नेट-सेट टीचर्स ऑर्गनायझेशनचे संयोजक कुशल मुडे यांनी केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WNFqtM
via nmkadda