आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रेही डिजिलॉकरद्वारे Rojgar News

आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रेही डिजिलॉकरद्वारे Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, नाशिक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आता त्यांची पदवी प्रमाणपत्रे सुविधेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्या हस्ते नुकतेच या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात २ लाख ९० विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ होणार आहे. भारत सरकारच्या 'डिजिटल इंडिया' या उपक्रमांतर्गत मुक्त विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) विद्यार्थ्यांचे डिजिलॉकरवर अॅकॅडेमिक अवॉर्ड रेकॉर्ड नोंदणी केली आहे. त्यानुसार २०१९ व २०२० मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची २६ व्या दीक्षांत समारंभाची एकूण २ लाख ९० हजार विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे डिजिलॉकरमध्ये डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी .gov.in या संकेतस्थळावर जाऊन किंवा डिजिलॉकर हे अॅप डाउनलोड करून आपल्या आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना एज्युकेशन या पर्यायावर क्लिक करून, यशवंतरा चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नाव निवडून नंतर पदवी प्रमाणपत्र या पर्यायावर क्लिक करून, शैक्षणिक माहिती भरल्यानंतर पदवी प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात डिजिलॉकरने उपलब्ध होणार आहे. भारतातील एकूण विद्यापीठे, राज्य शैक्षणिक शिक्षण मंडळ, शैक्षणिक संस्था यांच्यापैकी १७६ विद्यापीठे, राज्य शैक्षणिक शिक्षण मंडळ, शैक्षणिक संस्था यांनी डिजिलॉकरवर नोंदणी केली आहे. या सुविधा प्रारंभीप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, प्रोग्रॅमर राजेंद्र मरकड, डाटा प्रोसेसिंग सुपरवायझर प्रेमनाथ सोनवणे, सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रदीपकुमार पवार आदी मान्यवर उपस्थित होते. शैक्षणिक माहिती क्यूआर कोडद्वारे प्रमाणपत्रावर क्यूआर कोड असून, तो स्कॅन केल्यास आपली शैक्षणिक माहिती उपलब्ध होणार आहे. पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना आपला आधार क्रमांक नोंदविलेल्या विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र आधार क्रमांकाला डिजिलॉकरमध्ये लिंक करण्यात आले आहे. डिजिटल पदवी प्रमाणपत्रावर डिजिटल साईन असणार आहे. प्रमाणपत्र ठेवण्याची पद्धत विद्यार्थ्यांना डिजिलॉकर अॅप्लिकेशन डाउनलोड करून अकाऊंट उघडावे लागेल. गेट द डॉक्युमेंट फ्रॉम युनिव्हर्सिटी पर्यायावर क्लिक करावे लागेल. नंतर पर्मनंट रजिस्टरनंबर टाकून परीक्षा उत्तीर्णतेचे वर्ष निवडावे लागेल. त्यानंतर विद्यार्थी हे प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hSSKVD
via nmkadda

0 Response to "आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रेही डिजिलॉकरद्वारे Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel