
BSF GD Constable पदांवर क्रीडा कोटा अंतर्गत भरती, अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या Rojgar News
मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१
Comment

GD Constable : बीएसएफमध्ये जीडी कॉन्स्टेबलच्या पदांसाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया २२ सप्टेंबर २०२१ रोजी संपत आहे. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) क्रीडा कोटा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या जनरल ड्यूटी कॉन्स्टेबल भरतीसाठी नोंदणीची विंडो २२ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजता बंद होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचाय त्यांनी लवकर अर्ज भरावा लागेल. अंतिम तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाईट rectt.bsf.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो. BSF GD कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ९ ऑगस्ट २०२१ पासून सुरू झाली. बीएसएफने जाहीर केलेल्या नोटिफिकेशनुसार, ही भरती बॉक्सिंग, ज्युडो, स्विमिंग, क्रॉस कंट्री, कबड्डी, वॉटर स्पोर्ट्स आणि जिम्नॅस्टिक्स सारख्या खेळांसाठी आहे. तसेच इतर खेळांमध्ये तिरंदाजी, कुस्ती, वेटलिफ्टिंग, व्हॉलीबॉल, हँडबॉल, नेमबाजी, बास्केटबॉल, फुटबॉल आणि इतर खेळांचा समावेश आहे. त्यामुळे उमेदवारांना या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी बीएसएफने जाहीर केलेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Recruitment 2021: असा करा अर्ज जनरल ड्यूटी कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज केलेल्या इच्छुकांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- rectt.bsf.gov.in वर जावे. होमपेजवरील 'Recruitment of Meritious Sportspersons' या नोटिफिकेशनवर क्लिक करा. आता Apply Now पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन विंडो उघडेल. उमेदवारांना त्यांचे नाव, मोबाईल नंबर आणि मेल आयडी हा तपशील भरा. कामाचा अनुभव, पात्रता तपशील भरा. उमेदवार ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे अर्ज फी भरू शकतात. अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. भविष्यातील उपयोगासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा. उमेदवारांनी भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39mPugv
via nmkadda
0 Response to "BSF GD Constable पदांवर क्रीडा कोटा अंतर्गत भरती, अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या Rojgar News"
टिप्पणी पोस्ट करा