TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

दहावी-बारावीसाठी १७ नंबरचा अर्ज भरण्याची सुविधा Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२२ मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होण्यासाठी १७ नंबरचा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून, इच्छुक विद्यार्थ्यांना १६ सप्टेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येईल. राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी गुरुवारी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. आर्थिक दुर्बल घटकांमधील अनेक विद्यार्थी १७ नंबरचा अर्ज भरून, दहावी-बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होतात. त्याचप्रमाणे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे, अनेक विद्यार्थी काम करतात. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ शिक्षण घेता येत नाही. या सर्व विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीची परीक्षा देता यावी, यासाठी राज्य मंडळाकडून परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होण्याची संधी दिली जाते. त्यासाठी या विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज आणि शुल्क भरावे लागते. राज्य मंडळाच्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना १६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि शुल्क भरायचे आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज, शुल्क भरल्याची पावती दोन प्रतीत, मूळ कागदपत्रे १७ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत निवडलेल्या शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजात जमा करायचा आहे. विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज, शुल्काची पावती, मूळ कागदपत्रे आणि विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे १८ ऑक्टोबरला जमा करायचे आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीचा निकाल जुलै-ऑगस्टमध्ये जाहीर झाला आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज नोंदणीत शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याच्या दाखल्यावरील तारीख ३१ ऑगस्ट २०२१ अशी ग्राह्य धरण्यात यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा बदल केवळ मार्च २०२२ या परीक्षेपुरता लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वयासाठी अंतिम तारीख ही ३१ जुलै अशीच ग्राह्य धरण्यात येणार आहे, असे स्पष्टपणे परिपत्रकात नमूद केले आहे. या कागदपत्रांची गरज विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, दाखला नसल्यास द्वितीय प्रत आणि प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो जवळ ठेवावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना ही कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. संपर्कासाठी विद्यार्थ्यांनी ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक नोंदवणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर, त्याची प्रत ई-मेल आयडीवर पाठवली जाणार आहे. या अर्जाची प्रिंट आउट, शुल्क भरल्याची पावती, हमीपत्र आदींची छायाप्रत प्रत्येकी दोन प्रतीत काढून ठेवावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे... दहावीसाठी अर्जाची लिंक -htpp://form17.mh-ssc.ac.in बारावीसाठी अर्जाची लिंक - htpp://form17.mh-hsc.ac.in दहावीसाठी शुल्क - १००० रुपये शुल्क आणि १०० रुपये प्रक्रिया शुल्क बारावीसाठी शुल्क - ५०० रुपये शुल्क आणि १०० रुपये प्रक्रिया शुल्क शुल्क भरण्याची पद्धत - ऑनलाइन संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक - ०२०-२५७०५२०७, २५७०५२०८, २५७०५२७१


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3E6vuge
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या