कोकण रेल्वेअंतर्गत विविध पदांची भरती, ३५ हजारपर्यंत मिळेल पगार Rojgar News

कोकण रेल्वेअंतर्गत विविध पदांची भरती, ३५ हजारपर्यंत मिळेल पगार Rojgar News

Konkan : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये होणाऱ्या भरती अंतर्गत जम्मू -काश्मीरमध्ये चालवल्या जाणाऱ्या USBRL प्रकल्पासाठी तांत्रिक सहाय्यकाची पदे भरली जाणार आहेत. कोकण रेल्वेने यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर केले आहे. तांत्रिक सहाय्यक पदावर भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. या नोकरीशी संबंधित आवश्यक माहिती कोकण रेल्वेची अधिकृत वेबसाइट konkanrailway.com वर देण्यात आली आहे. नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक नागरी पदासाठी सात रिक्त जागा आहेत. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक सिव्हिल पदासाठी देखील सात रिक्त जागा आहेत. या दोन पदांच्या रिक्त जागेत पाच जागा ओबीसी आणि दोन एसटी प्रवर्गासाठी राखीव आहेत. सामान्य श्रेणीसाठी रिक्त जागा नाहीत. वयोमर्यादा वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी कमाल वय ३द वर्षे असावे. तर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यकासाठी कमाल वय २५ वर्षे आहे. दोन्ही पदांसाठी उमेदवारांचे वय १ सप्टेंबर २०२१ पासून मोजले जाईल. कोकण रेल्वेमध्ये भरतीमधील पदांवर वेतन निवड झालेल्या उमेदवारांना वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (नागरी) पदांवर दरमहा ३५ हजार पगार दिला जाईल. तर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (नागरी) पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ३० हजार रुपये पगार दिला जाईल. कोकण रेल्वेमध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वरिष्ठ आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक नागरी - BE/B.Tech सिविल डिग्री. किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वॉक इन इंटरव्ह्यू कधी होईल? वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक - २० ते २२ सप्टेंबर सकाळी ९.३० ते दुपारी १.३० पर्यंत कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक - ३ ते २५ सप्टेंबर सकाळी ९.३० ते दुपारी १.३० पर्यंत


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DUAi8u
via nmkadda

0 Response to "कोकण रेल्वेअंतर्गत विविध पदांची भरती, ३५ हजारपर्यंत मिळेल पगार Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel