Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २३, २०२१ WIB
Last Updated 2021-09-23T12:43:11Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

कागदपत्रांच्या सुरक्षिततेसाठी सीबीएसईचे ब्लॉकचेन तंत्रज्ञान Rojgar News

Advertisement
blockchain technology: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने () आपल्या निकालांचे प्रमाणपत्र रेकॉर्डवर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी तंत्रज्ञानााची मदत घेतली आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या (blockchain technology) मदतीने निकालांचे प्रमाणपत्र सुरक्षित राहणार आहेत. सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली. निकालाची प्रमाणपत्रे चेन संरचनेत ठेवली जातील जेणेकरून ते बिघडणार नाहीत आणि कागदाशिवाय वापरता येतील. या तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध ठिकाणची प्रमाणपत्रे अशा प्रकारे सुरक्षित ठेवता येतील. यामुळे कोणीही महत्वाच्या कागदपत्रांशी छेडछाड करू शकणार नाही. सीबीएसईतर्फे २०१९-२१ या वर्षासाठी दहावी आणि बारावीचे डिजिटल स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये मागील वर्षांचे प्रमाणपत्र देखील डिजिटल स्वरूपात रूपांतरित केले जाणार आहे. सीबीएसईने डिजीटल स्वरुपात नवीन प्रमाणपत्र जाहीर केल्यावर अतिरिक्त सुरक्षित लिंक तयार करण्यात आली. यानुसार डिजिटल स्वाक्षरी केलेली प्रमाणपत्रे ब्लॉकचेन आधारित यंत्रणेकडे पाठवली जाणार आहेत. हे नेटवर्क बंगळुरू, पुणे आणि जयपूरमध्ये नोड्ससह स्थापित करण्यात आले आहे. सध्या प्रमाणपत्र श्रृंखलचे व्यवस्थापन एनआयसी त्याच्या डेटा केंद्रांवर करते. सीबीएसईतर्फे 'त्या' विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. या संदर्भात सीबीएसईने अधिकृत वेबसाइटवर एक नोटिफिकेशन जाहीर केले आहे. करोना प्रादुर्भावात आपले पालक किंवा दत्तक पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क किंवा नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही असा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार, बोर्डाशी संलग्न शाळांना अशा विद्यार्थ्यांचा तपशील देण्यास सांगितले आहे. अशा विद्यार्थ्यांची सत्यता पडताळून एलओसी सादर करण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी २०२१-२२ साठी शाळांना एलओसीसाठी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत तपशील सादर करायचा आहे. त्यानंतर विलंब शुल्कासहित ९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत माहिती द्यावी लागणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XRKf6i
via nmkadda