Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०२, २०२१ WIB
Last Updated 2021-09-02T14:45:24Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये १७३ जागा रिक्त Rojgar News

Advertisement
२०२१: भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत येणाऱ्या नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड (NHPC)विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, पगार यांचा तपशील अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. एनएचपीसी अंतर्गत एकूण १७३ जागा भरल्या जाणार आहेत. याअंतर्गत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (Senior Medical Officer), सहाय्यक राजभाषा अधिकारी (Assistant Rajbhasha Officer), कनिष्ठ अभियंता-सिव्हिल, इलेक्ट्रीकल आणि मॅकेनिकल(Junior Engineer -) आणि वरिष्ठ अकाऊंटंट (Sr. Accountant) पदांच्या जागांवर भरती केली जाणार आहे. या पदभरतीमध्ये अनुसूचित जाती/जमाती आणि इतर मागास वर्गासाठी सरकारी नियमानुसार सवलत मिळणार आहे. पदांचा तपशील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (Senior Medical Officer) पदाच्या १३ जागा भरल्या जाणार आहेत. पदासाठी उमेदवाराकडे वैध नोंदणीसह MBBS डिग्री असणे आवश्यक आहे. यामध्ये टक्केवारीची कोणती अट नाही. उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करु शकतो. वयोमर्यादा ३३ वर्षे पूर्ण असावी. निवड झालेल्या उमेदवारास ६० हजार ते १ लाख ८० हजार पर्यंत पगार मिळू शकतो. सहाय्यक राजभाषा अधिकारी (Assistant Rajbhasha Officer)पदाच्या ७ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा ३५ वर्षे पूर्ण असावी. निवड झालेल्या उमेदवारास ४० हजार ते १ लाख ४० हजार पर्यंत पगार देण्यात येईल. ज्युनिअर इंजिनीअर सिव्हिल, इलेक्ट्रीकल आणि मॅकेनिकल(Junior Engineer -) पदांसाठी ६० टक्के गुणांसह संबंधित फिल्डमधील डिप्लोमा असणे आवश्यक आहे. या तिनही फिल्डमधील १३३ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ३१ वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. तर यासाठी निवड झालेल्या उमेदवारास २९ हजार ६०० ते १ लाख १९ हजार ५०० इतका पगार मिळू शकतो. वरिष्ठ अकाऊंटंट (Sr. Accountant)पदासाठी उमेदवाराकडे CA किंवा CMA सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. या पदाच्या २० जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवार ३० वर्षे पूर्ण असावा. यासाठी निवड झालेल्या उमेदवाराला २९ हजार ६०० ते १ लाख १९ हजार ५०० इतका पगार मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया अर्ज करण्यासाठी उमेदवाराने अधिकृत वेबसाइट https://ift.tt/3w7kJFv वर ऑनलाइन अर्ज करायचा आहे. उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया १ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. तसेच ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. मदतीसाठी उमेदवार हेल्पडेस्कच्या nhpchelpdesk2021@gmail.com या ईमेलवर किंवा ०२२ ६१०८७५६४ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3t7bYuM
via nmkadda