Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-09-08T11:43:39Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

UCEED २०२२ च्या नोंदणीसाठी IIT मुंबईतर्फे महत्वाची अपडेट Rojgar News

Advertisement
UCEED 2022: मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी () ने अंडरग्रॅज्युएट कॉमन एन्ट्रन्स एक्झाम फॉर डिझाईन () साठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यासंदर्भातील माहिती पुस्तिका अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यानुसार ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया ९ सप्टेंबर २०२१ पासून सुरू होणार आहे. ही परीक्षा २३ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट uceed.iitb.ac.in वर जाऊन ऑनलाइन नोंदणी करू शकतात. महत्वाच्या तारखा ऑनलाइन नोंदणी सुरु होण्याची तारीख: ९ सप्टेंबर २०२१ ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख: १० ऑक्टोबर २०२१ विलंब शुल्कासह नोंदणी करण्याची अंतिम तारीख: १७ ऑक्टोबर २०२१ प्रवेशपत्र जाहीर करण्याची तारीख: ८ जानेवारी २०२२ परीक्षेची तारीख: २३ जानेवारी २०२२ सन २०२१ मध्ये बारावीच्या परीक्षेत सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार UCEED 2022 साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. याव्यतिरिक्त २०२२ ला होणारी बारावीची परीक्षा पहिल्यांदाच देणारे विद्यार्थी देखीलअर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन माहिती पुस्तिकेमध्ये यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वेबसाइटवर जाऊन अर्जाशी संबंधित सूचना तपासाव्यात. या स्टेप्स फॉलो करुन करा नोंदणी UCEED २०२२ नोंदणीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट uceed.iitb.ac.in ला जावे. होमपेजवर असलेल्या रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा. आता नोंदणी पोर्टलवर क्लिक करा. नवीन पेज ओपन होईल. मागितलेली माहिती भरुन नोंदणी करा. क्रेडेन्शियलसह लॉगिन करून पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nclBHK
via nmkadda