UPSC परीक्षेत अयशस्वी उमेदवारांना पंतप्रधान मोदींचा संदेश Rojgar News

UPSC परीक्षेत अयशस्वी उमेदवारांना पंतप्रधान मोदींचा संदेश Rojgar News

Final Results: केंद्रीय लोकसेवा आयोगाने ( Union Public Service Commission, UPSC)नुकताच यूपीएससी नागरी सेवा परीक्षा निकाल २०२० जाहीर केला. बिहारच्या शुभम कुमारने या परीक्षेत अव्वल स्थान मिळवले तर जागृती अवस्थीने दुसरा क्रमांक मिळवला आहे. अंकिता जैन, यश जलुका आणि ममता यादव अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच परीक्षेत यशस्वी होऊ न शकलेल्या उमेदवारांना ट्विटरच्या माध्यमातून विशेष संदेश दिला आहे. 'ज्या तरुण मित्रांनी यूपीएससी परीक्षा पास केली नाही, त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही खूप प्रतिभावान आहात. आणखी प्रयत्न तुमची वाट पाहत आहेत. भारत हा विविध संधी शोधणाऱ्यांनी भरलेला आहे. तुम्ही तुमच्या पुढील आयुष्यात जे काही करायचे ठरवाल त्यासाठी शुभेच्छा' असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले. यांनी ट्विटरच्या माध्यमातून यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले. 'यूपीएससी नागरी सेवा परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्यांचे अभिनंदन. सार्वजनिक सेवेतील एक रोमांचक आणि समाधानकारक कारकीर्द तुमची वाट पाहत आहे असे पंतप्रधान आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले. पूर्व परीक्षा ऑक्टोबर २०२० मध्ये घेण्यात आली होती. त्याचवेळी, आयोगाने ८ जानेवारी ते १७ जानेवारी २०२१ दरम्यान मुख्य परीक्षा घेतली. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले गेले. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि इतर केंद्रीय सेवांमध्ये (ग्रुप ए आणि ग्रुप बी) निवड करण्यासाठी मुलाखत २ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२१ दरम्यान घेण्यात आली. यानंतर अंतिम निकाल जाहीर झाला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3i5GocJ
via nmkadda

0 Response to "UPSC परीक्षेत अयशस्वी उमेदवारांना पंतप्रधान मोदींचा संदेश Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel