Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ११, २०२१ WIB
Last Updated 2021-10-11T05:43:48Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

AMD Recruitment 2021: अणुऊर्जा विभागात विविध पदांची भरती, 'येथे' करा अर्ज Rojgar News

Advertisement
AMD : विभागात सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाअंतर्गत येणाऱ्या अणु खनिज अन्वेषण आणि संशोधन संचालनालयातर्फे (AMD)ग्रुप ए आणि ग्रुप सी पदांच्या भरतीसाठी १० ऑक्टोबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार वैज्ञानिक शास्त्रज्ञ (Scientific Scientist), तंत्रज्ञ (Technician), उच्च विभाग लिपिक (Upper Division Clerk,UDC), चालक (सामान्य श्रेणी) Driver,Ordinary Grade)आणि सुरक्षा रक्षक (Security Guard)या एकूण १२४ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. असा करा अर्ज खनिज अन्वेषण आणि संशोधन संचालनालय (AMD) भरतीसाठी इच्छुक उमेदवार संचालनालयाच्या अधिकृत वेबसाइट amd.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरून अर्ज करू शकतात. वेबसाइटवर गेल्यानंतर उमेदवारांना अपडेट्स विभागात जावे लागेल. यानंतर जिथे तुम्हाला संबंधित भरतीच्या लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर नवीन पेजवर हिंदी किंवा इंग्रजीतील जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करा. ऑनलाईन अर्जाच्या पेजची लिंक भरती जाहिरातीतच दिली आहे. भरती जाहिरात आणि अर्जाच्या पेजची लिंक देखील खाली देण्यात आली आहे. शैक्षणिक आर्हता सायंटिफिक सायन्टिस्ट - या पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा संबंधित विषयामध्ये किमान ६० टक्के गुण असणे गरजेचे आहे. टेक्निशियन बी - मान्यताप्राप्त मंडळातून एसएससीमध्ये किमान ६० टक्के गुण आणि संबंधित ट्रेडमध्ये किमान एक वर्षाचे आयटीआय प्रमाणपत्र. अप्पर डिव्हिजन वर्क (UDC) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५० टक्के गुणांसह पदवी. प्रति मिनिट किमान ३० शब्दांच्या वेगाने इंग्रजी टायपिंग ड्रायव्हर (ऑर्डिनरी ग्रेड) - मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण. तसेच, LMV ड्रायव्हिंग लायसन्स आणि ३ वर्षांचा अनुभव सिक्योरीटी गार्ड - मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असणे गरजेचे आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी २४ ऑक्टोबरपर्यंत आपले अर्ज पाठवायचे आहेत. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्यापुर्वी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. ग्रुप ए आणि ग्रुप बी पदांसाठी प्रवेशपत्र जाहीर भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागांतर्गत येणाऱ्या इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्रात(IGCAR) ग्रुप ए आणि ग्रुप बी पदांसाठी अर्ज केलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. IGCAR ने ग्रुप ए आणि बीच्या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेला अर्ज केलेले उमेदवार आपले प्रवेशपत्र IGCAR च्या अधिकृत वेबसाइटवर igcar.gov.in वर जाऊन डाऊनलोड करु शकतात. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्रात ग्रुप ए आणि ग्रुप बी पदांसाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. केंद्राने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ही परीक्षा २१ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घेण्यात येईल. प्रत्येक नियोजित तारखेला ही परीक्षा दोन बॅचमध्ये घेतली जाणार आहे. या बॅचेस २-२ तासांच्या असतील. बॅच सकाळी १० आणि दुपारी २ वाजता सुरू होतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iP4icU
via nmkadda