Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २०, २०२१ WIB
Last Updated 2021-10-20T12:43:41Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ICSE कडून दहावी आणि बारावीच्या टर्म परीक्षा स्थगित Rojgar News

Advertisement
CISCE : काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने(Council for the Indian School Certificate Examinations, CISCE) म्हणजेच आणि ISC म्हणजे बारावीच्या टर्म १ परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. आयएससीईचे मुख्य कार्यकारी आणि सचिव गेरी अराथून यांनी याबद्दल माहिती दिला. काही कारणांमुळे बोर्डाने २०२१-२२ सत्रासाठी दहावी आणि बारावीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. नवीन परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती लवकच दिले जाणार आहे. आयएससीई दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार होत्या. या संदर्भात ची अधिकृत वेबसाइट https://www.cisce.org वर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आयएससीईने सीबीएसईच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर दोन अटींवर दहावी आणि बोर्डाच्या परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएसईप्रमाणे येथे यात टर्म १ आणि टर्म २ परीक्षा आहेत. या प्रणाली अंतर्गत, बोर्डाच्या टर्म १ च्या परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार होत्या पण आता त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ISCE ने दहावी आणि बारावी टर्म १ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. या परीक्षा १५ नोव्हेंबर २०२१ पासून होणार होत्या. मागील वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा १६ डिसेंबर २०२१ रोजी संपणार होती. याशिवाय दहावीच्या परीक्षा ६ डिसेंबर २०२१ रोजी संपणार होती. CISCE ने कोविड-१९ संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यानंतर विशिष्ट सूत्रानुसार, मूल्यांकन करत विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला होता. २४ जुलै रोजी बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला. यावर्षीICSE म्हणजेच दहावीचा निकाल ९९.९८ टक्के होता. ISC म्हणजेच बारावीच्या निकालाची उत्तीर्णता ९९.७६ टक्के होती. दरम्यान आता नव्या अपडेटनुसार टर्म १ च्या परीक्षा पुढील सूचना येईपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3G7SA7k
via nmkadda