Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २६, २०२१ WIB
Last Updated 2021-10-26T13:43:47Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IIM CAT परीक्षेचे प्रवेशपत्र 'असे' करा डाउनलोड Rojgar News

Advertisement
Admit Card 2021: कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१ (Common Admission Test)चे २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता जाहीर केले जाणार आहे. या प्रवेश परीक्षेला अर्ज केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अहमदाबादतर्फे २८ नोव्हेंबर रोजी भारतातील १५९ शहरांमधील ४०० परीक्षा केंद्रांवर कॅट २०२१ परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार यावर्षी सुमारे २.३१ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर उमेदवारांनी त्यांचे नाव, जन्मतारीख, अर्ज क्रमांक, श्रेणी, परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता, कॅट २०२१ परीक्षेचा दिवस आणि शिफ्टच्या वेळेसह सर्व माहिती तपासून घेणे गरजेचे आहे. परीक्षेच्या दिवशी पाळल्या जाणार्‍या सर्व मार्गदर्शक सूचना प्रवेशपत्रावर दिल्या जाणार आहेत. CAT 2021 Admit Card: असे करा डाऊनलोड स्टेप १ : सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जा. स्टेप २: वेबसाइटवर दिलेल्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप ३: आता नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. स्टेप ४: तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. स्टेप ५: ते आता डाउनलोड करा. स्टेप ६: परीक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी त्याची प्रिंट आउट घ्या. CAT परीक्षेचा नमुना अहमदाबादतर्फे(IIM, Ahmedabad) २८ नोव्हेंबर रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी एकूण ७६ प्रश्न विचारण्यात आले होते. यंदा कॅटमध्ये ६४ ते ६८ प्रश्न विचारले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रश्न तीन भागात विचारले जातील. शाब्दिक क्षमता आणि वाचन आकलन, वाचन, परिमाणात्मक क्षमता आणि डेटा इंटरप्रिटेशन आणि लॉजिकल रिझनिंगमधून प्रश्न येतील. प्रत्येक सेक्शन सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना ४०-४० मिनिटे दिली जाणार आहेत. अपंग व्यक्तींना (PH उमेदवार) प्रश्न सोडवण्यासाठी १३ मिनिटे २० सेकंदांचा अतिरिक्त वेळ मिळेल. प्रत्येक विभागातून २० ते २४ प्रश्न विचारले जातील. पेपरमध्ये मल्टिपल चॉइस आणि नॉन मल्टिपल चॉइस असे दोन्ही प्रश्न असतील. MCQ मध्ये निगेटिव्ह मार्किंगची असेल आणि नॉन MCQ मध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bfqQiN
via nmkadda