Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-10-08T05:43:48Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

MHT-CET 2021: एमएचटी सीईटीला ८० टक्केच उपस्थिती Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई इंजिनीअरिंग आणि तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेला सुमारे ८० टक्के विद्यार्थ्यांनीच हजेरी लावली आहे. २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत ही प्रवेश परीक्षा पार पडली होती. पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) गटातून दोन लाख ३० हजार ६५५ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४० हजार २३२ हजार विद्यार्थी गैरहजर राहिले; तर एक लाख ९० हजार ४२३ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली, तर उपस्थितीचे प्रमाण ६२.५६ टक्के इतके होते. पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) गटातून दोन लाख ७६ हजार ८४१ नोंदणी केली होती. यापैकी ५७ हजार ३४४ हजार विद्यार्थी गैरहजर राहिले होते; तर दोन लाख १९ हजार ४९७ विद्यार्थ्यांनी दिली हे प्रमाण ७९.२९ टक्के आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) परीक्षा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेतली होती. दोन्ही गटातून पाच लाख ७ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सर्व विद्यार्थ्यांना दिवस आणि सत्राचे नियोजन करत परीक्षा ऑनलाइन घेण्यात आली होती. पीएसएम गटाची परीक्षा १० सत्रांत झाली. वेगवेगळ्या सत्रांत झालेल्या परीक्षा सुरळीत घेण्यात आल्या. या परीक्षांचा निकाल २० ऑक्टोबरपर्यंत जाहीर करण्यात येणार असून, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ नोव्हेंबरपासून सुरू होईल. पूरपरिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आला नाही अशा विद्यार्थ्यांना आता ९ आणि १० ऑक्टोबरला संधी दिली जाणार आहे. गट -- एकूण नोंदणी -- गैरहजर -- उपस्थिती -- टक्केवारी पीसीएम -- २,३०,६५५ -- ४०,२३२ १,-- ९०,४२३ -- ८२.५६% पीसीबी -- २,७६,८४१ -- ५७,३४४ -- २,१९,४९७ -- ७९.२९% हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Fuv9o8
via nmkadda