NEET 2021 परीक्षा जुन्या पॅटर्ननुसारच, पुढील वर्षापासून लागू होणार नवीन पॅटर्न Rojgar News

NEET 2021 परीक्षा जुन्या पॅटर्ननुसारच, पुढील वर्षापासून लागू होणार नवीन पॅटर्न Rojgar News

Exam Pattern: यावर्षी जुन्या पॅटर्ननुसार घेण्यात येणार आहे. पुढील वर्षापासून नीट २०२१ नवीन पॅटर्ननुसार लागू होणार आहे. केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा मंडळाने सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात माहिती दिली. पोस्ट ग्रॅज्युएट नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट-सुपर स्पेशालिटी (NEET-SS) २०२१ जुन्या पॅटर्ननुसार घेण्यात येणार असून पुढील वर्षापासून आणि नवीन पॅटर्न लागू होईल. देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची परीक्षा पुढे ढकलली जाईल असे याआधी राष्ट्रीय परीक्षा मंडळाने सांगितले होते. ही परीक्षा आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत होणार आहे. तसेच, नवीन पॅटर्नला परवानगी द्यावी, उमेदवारांना वेळ देण्यासाठी परीक्षा जानेवारीपर्यंत पुढे ढकलावी अशी विनंती NBE ने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. काही विद्यार्थ्यांनी NEET-SS परीक्षा (National Eligibility Cum Entrance Test for Super Specialty Courses) मधील पॅटर्नमध्ये बदल करण्यास आक्षेप घेतला होता आणि परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. प्रवेशासाठी नोव्हेंबरमध्ये परीक्षा होणार आहे आणि ऑगस्ट महिन्यात परीक्षेचा पॅटर्न बदलण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहे. ते एका वर्षापासून या परीक्षेची तयारी करत आहेत अशी बाजु विद्यार्थ्यांच्यावतीने मांडण्यात आली. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला यावर विचार करण्यास सांगितले होते. त्यानंतर केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, आता परीक्षा नोव्हेंबर ऐवजी जानेवारीत होईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना नवीन पॅटर्न अंतर्गत तयारी करण्याची संधी मिळेल. NBE कडून परीक्षा पद्धतीबाबत मागितले उत्तर राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा सुपर स्पेशालिटी (NEET-SS 2021) च्या परीक्षेत राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (NBE) जाहीर केलेल्या बदलांना आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने सुनावले पोस्ट ग्रॅज्युएट नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रस टेस्ट-सुपर स्पेशियालिटी (NEET-SS) 2021 च्या परीक्षा पॅटर्नमध्ये अखेरच्या वेळी बदल केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि नॅशनल बोर्ड एक्झामिनेशनला फटकारले होते. सत्तेच्या खेळात या तरुण डॉक्टरांना फुटबॉल समजू नका अशा भाषेत सुप्रीम कोर्टाने सुनावले होते. यापूर्वी १२ सप्टेंबर २०२१ रोजी कथित पेपर लीक आणि गैरप्रकारामुळे आयोजित NEET-UG परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. १२ सप्टेंबर २०२१ रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (अंडर-ग्रॅज्युएट) २०२१ पेपर लीक कथित प्रकरण आणि त्यावरील सीबीआयचा तथ्य शोध अहवाल पाहून ही याचिका रद्द करण्यात आली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Dcxqm7
via nmkadda

0 Response to "NEET 2021 परीक्षा जुन्या पॅटर्ननुसारच, पुढील वर्षापासून लागू होणार नवीन पॅटर्न Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel