Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ०६, २०२१ WIB
Last Updated 2021-10-06T08:43:14Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

मुंबई महानगर पालिकेत पुन्हा एकदा भरती, ४५ हजारपर्यंत मिळेल पगार Rojgar News

Advertisement
BMC Recruitment 2021: मुंबई महानगर पालिकेतर्फे पुन्हा एकदा विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पदभरतीअंतर्गत समाज विकास अधिकारी (Community Development Officer) आणि सहाय्यक समाज विकास अधिकारी (Assistant Community Development Officer) या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रता निकष समाज विकास अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून सोशल वर्कमध्ये डिग्री असणे गरजेचे आहे. उमेदवाराने दहावी, बारावीमध्ये शंभर मार्काचा मराठी विषय देऊन तो उत्तीर्ण केला असावा. उमेदवाराकडे गृहनिर्माण संस्था निर्माण करून त्यांची नोंदणी करणे, झोडपडपट्टी पुनर्विकास करणे इत्यादी कामाचा २० वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी उमेदवाराचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच निवड झालेल्या उमेदवारास ४५ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. सहाय्यक समाज विकास अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून सोशल वर्कमध्ये डिग्री असणे गरजेचे आहे. उमेदवाराने दहावी, बारावीमध्ये शंभर मार्काचा मराठी विषय देऊन तो उत्तीर्ण केला असावा. उमेदवाराकडे गृहनिर्माण संस्था निर्माण करून त्यांची नोंदणी करणे, झोडपडपट्टी पुनर्विकास करणे इत्यादी कामाचा किमान १५ ते २० वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी उमेदवाराचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच निवड झालेल्या उमेदवारास ३५ हजार रुपये दरमहा पगार दिला जाईल. महत्वाची सूचना या पदासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज फुलस्केप कागदावर लिहून पाठवायचा आहे. आपलं नाव, पत्ता, वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव या सर्व गोष्टी लिहून पाठवायच्या आहेत. शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचा दाखला आणि इतर महत्त्वाची कागदपत्रं सोबत जोडणं आवश्यक आहे. उमेदवारांनी आपला अर्ज आणि आवश्यक कागदपत्र सहायक आयुक्त (मालमत्ता) कार्यालय, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई या पत्त्यावर पाठवायचा आहे. १२ ऑक्टोबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद केला जाऊ शकतो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YoLz0s
via nmkadda