रेल्वेत नोकरीच्या नावाखाली मिळाले ऑफर लेटर, PIB ने दिले स्पष्टीकरण Rojgar News

रेल्वेत नोकरीच्या नावाखाली मिळाले ऑफर लेटर, PIB ने दिले स्पष्टीकरण Rojgar News

Government Jobs: निवृत्तीनंतर चांगल्या पगारासह जीवनात स्थिरावण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांमध्ये सरकारी नोकऱ्यांबाबत मोठी क्रेझ असते. त्यामुळे सरकारी नोकऱ्यांना तरुणांचे अधिक प्राधान्य असते.सिव्हिल सर्व्हिसेस, एसएससी, बँक जॉब्स आणि रेल्वे जॉब्ससाठी तरुण खूप मेहनत घेत असतात. पण अनेक वेळा सरकारी नोकरीच्या हव्यासापोटी लोक फसवणुकीला बळी पडतात. रेल्वेत नोकऱ्या मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेकडो लोकांची फसवणुक केली जाते. कधी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या हमीच्या नावाखाली तर कधी लाच देऊन नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली तरुणांची लुटले जाते. अनेकदा बनावट जाहिरातीद्वारे अशी फसवणूक सुरू होते आणि पैसे घेतल्यानंतर त्यांना बनावट नोकरीचे ऑफर लेटरही दिले जाते. अशाच एका ऑफर लेटरद्वारे रेल्वे मंत्रालयाच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला गेला. ही घटना नुकतीच उघडकीस आली आहे. काय आहे व्हायरल ऑफर लेटरमध्ये? रेल्वे मंत्रालयाच्या नावाने एक ऑफर लेटर समोर आले आहे. ज्यामध्ये समोरच्या व्यक्तीची लिपिक पदावर नियुक्ती केल्याचा दावा केला जात आहे. हे ऑफर लेटरही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून लोकांमध्ये पसरवले जात आहे. मात्र या पत्राची तथ्यता सरकारकडून करण्यात आली आले आहे. सरकारी माहिती एजन्सी पीआयबीच्या तथ्य तपासणी पथकाने या पत्राची चौकशी करून खंडन केले आहे. सत्य काय आहे? पीआयबी फॅक्ट चेक नावाची केंद्रीय माहिती एजन्सी पीआयबीची तथ्य तपासणी शाखा आहे. हे तथ्य तपासणी पथक सरकार, मंत्रालये आणि त्यांच्याशी संबंधित विभागांबद्दल पसरवली जाणारी, दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती तपासते. चुकीचे आढळल्यास त्यांचे खंडन करते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या रेल्वे मंत्रालयातील जॉब ऑफर लेटरचे सत्यही या पीआयबीतर्फे समोर आणण्यात आले आहे. #PIBFactCheck ने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंदर्भात ट्विट केले आहे. त्या ट्वीटनुसार रेल्वे मंत्रालयाच्या नावाने एक ऑफर लेटर जाहीर करण्यात आले आहे. ज्यामध्ये अर्जदाराची लिपिक म्हणून नियुक्ती झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हे पत्र पूर्णपणे बनावट आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत २१ रेल्वे भर्ती बोर्डांद्वारे आयोजित केलेल्या परीक्षांच्या आधारे रेल्वेमध्ये नोकऱ्या दिल्या जातात. रेल्वेचे सर्व भरती बोर्ड वेळोवेळी परीक्षा घेतात. यानंतर रेल्वेत नोकरी मिळते. त्यामुळे अशा कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नका. वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाईल असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांकडे करा तक्रार उमेदवारांना भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवून देणाऱ्या, मदत करण्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीची माहिती पोलिसांना द्या. नोकरी मिळवण्यासाठी मोबाईल, फोन किंवा ईमेलद्वारे तुमच्याशी संपर्क साधल्यास त्याआधारे तक्रार करा. जर कोणी तुम्हाला आकर्षक ऑफर देत असेल तर तुम्ही १८२ वर तक्रार करा. आरआरबीची अधिकृत वेबसाइट http://rrcb.gov.in वर यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकेल. तसेच उमेदवारांची फसवूणक झाली असल्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Zpuwvt
via nmkadda

0 Response to "रेल्वेत नोकरीच्या नावाखाली मिळाले ऑफर लेटर, PIB ने दिले स्पष्टीकरण Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel