Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ०४, २०२१ WIB
Last Updated 2021-10-04T11:43:30Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

एकदा उघडलेल्या शाळा बंद होऊ द्यायच्या नाहीत असा निर्धार करा: मुख्यमंत्री Rojgar News

Advertisement
CM on schools reopening: 'राज्यातील करोना काळानंतर सुरू झाल्या आहेत. शिक्षक, विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर या शिक्षणाच्या उत्सवाला प्रतिसाद दिला आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी, हे अभियान जसे आम्ही सुरू केले, तसेच ते शाळांच्या बाबतीतही आहे. शाळा सुरक्षितपणे सुरू राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती आपण यशस्वीपणे पार पाडू, असा मला विश्वास आहे. एकदा उघडलेल्या शाळा बंद होऊ द्यायच्या नाहीत असा निर्धार करा,' असे आवाहन मुख्यमंत्री यांनी सोमवारी केले. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या सचिव वंदना कृष्णा यांच्या उपस्थितीत ठाकरे यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या शाळेच्या पहिल्या दिवसाचे स्वागत करणारे गाणेही यावेळी शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांना दाखवले. आपल्या शाळेच्या आठवणी यावेळी ठाकरे यांनी जागवल्या. विद्यार्थ्यांसमोरच्या आजच्या कठीण काळाचे आव्हान मोठे असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले आणि या आव्हानाला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या भविष्याचे दार उघडले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या लहानपणीच्या शाळेतली आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, 'सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. पूर्वीचे दिवस वेगळेच असायचे. मित्रांना भेटण्याची उत्सुकता, पावसाळी दिवसातल्या मातीच्या सुगंधासह नव्या वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे. आताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला सर्वात आव्हानात्मक काळ सुरू आहे. आम्हाला कधीतरी शाळेत दांडी मारायची लहर यायची. आता शाळेत जाऊ कधी हा प्रश्न सर्वांना पडला आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे कठीण आणि आव्हानात्मक होतं आणि आहे. मुलं नाजुक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते. आज आपण मुलांच्या भविष्याचे, विकासाचे, प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.' सूचनांचे काटेकोर पालन करा रवींद्रनाथ टागोरांनी शाळा शांतीनिकेतन निसर्गाच्या सानिध्यात उघडली होती. सुविधा नव्हती म्हणून त्यांनी तसे केले की आरोग्यदायी जा शिक्षणाची जागा बंदिस्त असता कामा नये. शाळेची दारं खिडक्या उघड्या ठेवा. हसतीखेळती मुलं तशीच खेळती हवा हवीच. शाळेत निर्जंतुवणूकीकरण करा. मुलांमध्ये अंतर ठेवा. त्यांना मास्क लावायला सांगा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3owCWM4
via nmkadda