भारतीय नौदलात २५०० हून अधिक पदांची भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News

भारतीय नौदलात २५०० हून अधिक पदांची भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News

Navy Bharti 2021: भारतीय नौदलात आर्टिफिशर अप्रेंटिस (AA) आणि सिनिअर सेकेंडरी रिक्रूट (SSR) पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू होणाऱ्या बॅचसाठी ही अर्ज प्रक्रिया सुरु आहे. एए आणि एसएसआर पदांसाठी केवळ अविवाहित पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. २५ ऑक्टोबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय नौदलातर्फे यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. नोटिफिकेशननुसार, दहावी (१०+२) मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे १० हजार उमेदवारांची एक छोटी यादी तयार केली जाईल. १० हजार शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना लेखी चाचणी आणि आरोग्य चाचणीसाठी बोलावले जाईल. लेखी आणि वैद्यकीय परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची निवड आर्टिफिसर अप्रेंटिस (एए) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (एसएसआर) या पदांसाठी केली जाईल. पदाचा तपशील भारतीय नौदलाने दोन्ही पदांसाठी मिळून एकूण २५०० रिक्त पदांसाठी अर्ज मागविले आहेत. त्यापैकी ५०० रिक्त पदे आर्टिफिसर अप्रेन्टिस (एए) पदासाठी आणि सिनिअर सेकेंडरी रिक्रूट (एसएसआर) ची २ हजार पदे भरण्यात येणार आहेत. शैक्षणिक पात्रता आर्टिफिसर अप्रेंटिस (एए): या पदासाठी इच्छुक अर्जदाराने गणित आणि भौतिकशास्त्र व्यतिरिक्त रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक यापैकी कोणत्याही एका विषयात ६० टक्के गुणांसह १०+२ परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. वरिष्ठ माध्यमिक भरती (SSR): अर्जदाराने गणित आणि भौतिकशास्त्र व्यतिरिक्त विज्ञान/जीवशास्त्र/संगणकातील कोणत्याही एका विषयासह १०+२ परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा उमेदवाराचा जन्म १ फेब्रुवारी २००२ ते ३१ जानेवारी २००५ दरम्यान झालेला असावा. वेतन आणि भत्ता सुरुवातीच्या कालावधीत उमेदवारांना दरमहा १४ हजार ६०० रुपये स्टायपेंड दिला जाईल. परिक्षण पूर्ण झाल्यानंतर, संरक्षण पे मॅट्रिक्सच्या लेव्हल ३ (२१,७०० ते ६९,१००) अंतर्गत ठेवले जाईल. या व्यतिरिक्त, लष्करी सेवा भत्ता म्हणून दरमहा ५,२०० रुपये आणि एक्स-पे चाचणी दरम्यान ३,६०० रुपये दिले जातील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lJQ0fw
via nmkadda

0 Response to "भारतीय नौदलात २५०० हून अधिक पदांची भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel