Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २७, २०२१ WIB
Last Updated 2021-10-27T08:43:17Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

परीक्षा तीन दिवसांवर; पण अजून केंद्रच नाही Rojgar News

Advertisement
नागपूर : आरोग्य विभागातर्फे विविध पदांसाठी २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या परीक्षेत घोळ झाल्याने आता किमान ३१ तारखेची परीक्षा तरी व्यवस्थित होईल, असे वाटत असतानाच आता ही परीक्षा तीन दिवसांवर आली असतानाही विद्यार्थ्यांना अद्याप ओळखपत्रेच मिळालेली नाहीत. त्यामुळे आपल्याला नेमक्या कोणत्या केंद्रावर परीक्षा द्यावयाची आहे, याबाबत हे विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. आरोग्य विभागातील गट 'क' व गट 'ड'च्या जागा भरण्यासाठी काही महिन्यांपूर्वी जाहिरात देण्यात आली होती. २४ तारखेला झालेल्या परीक्षेदरम्यान अनेक घोळ झाले. त्यापासून धडा घेऊन ३१ ऑक्टोबरला होणाऱ्या 'ड' वर्गासाठीच्या परीक्षेचे नियोजन तरी व्यवस्थित केले जाईल, असे वाटत होते. मात्र आता ही परीक्षा तीन दिवसांवर आली तरी आमचे परीक्षा प्रवेश ओळखपत्र डाऊनलोडच होत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. आतापर्यंत विद्यार्थ्यांना वेबसाइटवर जाऊन आपले प्रोफाइल बघता येत होते व प्रवेशपत्र तेथूनच डाऊनलोड करावयाचे होते. मात्र आता ते प्रोफाइलच दिसत नसल्याचे 'ड' वर्ग पदासाठी अर्ज भरलेले स्वप्नील तुपे यांनी सांगितले. ते म्हणाले माझ्या आणखी दोन- तीन मित्रांनीही या परीक्षेसाठी अर्ज भरला आहे. मात्र आमच्यापैकी कुणाचेही ओळखपत्र अजून डाऊनलोड झालेले नाही. त्यामुळे ३१ ऑक्टोबर रोजीची परीक्षा होणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे. ओळखपत्रच न मिळाल्याने आपल्याला नेमके कोणते परीक्षा केंद्र मिळेल हेही स्पष्ट नाही. सरकारने हा संभ्रम दूर करावा, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bgRKGQ
via nmkadda