भारतीय सैन्यामध्ये भरती व्हायचंय? Rojgar News

भारतीय सैन्यामध्ये भरती व्हायचंय? Rojgar News

प्रा. संजय मोरे भारतीय सैन्यामध्ये अविवाहीत पुरुष/महिला उमेदवारांकरिता एप्रिल, २०२२पासून ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (ओटीए), चेन्नई येथे प्रशिक्षण कोर्स सुरू होणार आहे. त्यासाठी भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. ० एकूण १९१ पदं - पुरुष- ५८वा कोर्स- १७५ पदं - महिला- २९वा कोर्स- १४ पदं (संरक्षण दलातील सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पत्नींसाठी २ पदं) ० सिव्हील इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग, सॅटलाइट कम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, रिमोट सेन्सिंग, अॅग्रीकल्चर, एअरोनॉटिकल/ एव्हिऑनिक्स/ एअरोस्पेस, फायबर ऑप्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेंटेशन/इन्स्ट्रूमेंटेशन, ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग, प्रोडक्शन इंजिनीअरिंग, ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल इंजिनीअरिंग, इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग/ इंडस्ट्रियल इंजिनिअरींग अँड मॅनेजमेंट, वर्कशॉप टेक्नॉलॉजी, बायो मेडिकल इंजिनीअरिंग/मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, टेक्स्टाइल इंजिनीअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनीअरिंग, मेटॅलर्जिकल अँड एक्स्प्लेझिव्हज, न्यूक्लियर टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, बॅलिस्टिक्स इंजिनीअरिंग, रबर टेक्नॉलॉजी या क्षेत्रांमध्ये पदं रिक्त आहेत. ० पात्रता- संबंधित विषयातील इंजिनीअरिंग किंवा समतूल्य पदवी उत्तीर्ण. (जे उमेदवार अंतिम परीक्षा १ एप्रिल, २०२२पर्यंत उत्तीर्ण होतील ते अर्ज करण्यास पात्र आहेत). कम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग पदांसाठी एमएससी (कम्प्युटर सायन्स/ कम्प्युटर टेक्नॉलॉजी) पात्रताधारक अर्ज करू शकतात. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पदासाठी एमएससी (आयटी/ इन्फॉर्मेशन अँड टेलिकम्युनिकेशन) पात्रताधारक अर्ज करू शकतात. ० वयोमर्यादा- २०-२७ वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतील. ० निवडपद्धती- अंतिम वर्षाच्या गुणवत्तेनुसार किंवा अंतिम वर्षात शिकणाऱ्या उमेदवारांच्या सहाव्या सेमिस्टरपर्यंतच्या गुणवत्तेनुसार शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर सिलेक्शन सेंटरचं नाव कळवलं जाईल. त्यानंतर उमेदवारांनी वेबसाइटवर लॉगइन करून एसएसबीची तारीख निश्चित करावी. सिलेक्शन सेंटरवर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची सायकॉलॉजिस्ट, ग्रुप टेस्टिंग ऑफिसर आणि इंटरव्ह्यू ऑफिसर यांच्याकडून मुलाखत घेतली जाईल. एसएसबीने निवडलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी होईल. यात फिट ठरणाऱ्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार प्रशिक्षणासाठी निवड यादी जाहीर केली जाईल. ० प्रशिक्षण- निवडलेल्या उमेदवारांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल लेफ्टनंट पदावर नेमलं जाईल. त्यांना प्रोबेशनवर ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी, चेन्नई येथे ४९ आठवड्यांचं प्रशिक्षण दिलं जाईल. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यास उमेदवारांना मद्रास विद्यापीठाकडून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजिक स्टडिज ही पदवी दिली जाईल. प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारांना विवाह करता येणार नाही. ऑनलाइन अर्ज https://ift.tt/166cffQ या संकेतस्थळावर २७ ऑक्टोबर, २०२१पर्यंत करावेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uCuz2C
via nmkadda

0 Response to "भारतीय सैन्यामध्ये भरती व्हायचंय? Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel