Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ०५, २०२१ WIB
Last Updated 2021-10-05T05:43:31Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

MPSC exam schedule 2022: राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (Maharashtra Public Service Commission, MPSC) २९० पदांसाठी () २ जानेवारी २०२२ ला घेण्यात येणार असून, त्यासाठी आज, ५ ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याला सुरुवात ( 2021 Schedule) होणार आहे. मुख्य परीक्षा ७ ते ९ मे किंवा त्यानंतर घेतली जाणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे. एमपीएससीने सोमवारी राज्यसेवा परीक्षा २०२१ ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, सहायक राज्य कर आयुक्त, गटविकास अधिकारी आणि तत्सम पदे, वित्त व लेखा सेवा सहायक संचालक, उद्योग उपसंचालक, सहायक कामगार आयुक्त, उपशिक्षणाधिकारी आणि तत्सम पदे, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी अशी २९० पदे भरण्यात येणार आहे. एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या संवर्गातील पदसंख्या आणि आरक्षणामध्ये सरकारच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. जाहिरातीमध्ये नमूद संवर्गांपैकी काही मागास प्रवर्ग आणि समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत. मात्र, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आणि पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रामध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या मागास प्रवर्ग, समांतर आरक्षणासाठी पदे उपलब्ध होण्याची, विद्यमान पदसंख्येमध्ये बदल किंवा वाढ होण्याची शक्यता आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याला आज, मंगळवारी (पाच ऑक्टोबर) सुरुवात होणार असून, विद्यार्थ्यांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल. खुल्या प्रवर्गासाठी ५४४ रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी ३४४ रुपये शुल्क आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://ift.tt/3oZLYzp या वेबसाइटवर संपर्क साधावा. 'ती' मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अंतरिम आदेशाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीतर्फे ३० ऑक्टोबरला होणारी सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा २०२० पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना आता आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुख्य परीक्षेची सुधारित तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती एमपीएससीकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oMPlMn
via nmkadda