विद्यार्थ्यांसाठी कॉलेजे सज्ज; दीड वर्षांनंतर फुलणार कट्टे Rojgar News

विद्यार्थ्यांसाठी कॉलेजे सज्ज; दीड वर्षांनंतर फुलणार कट्टे Rojgar News

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : करोनाच्या सक्तीच्या लॉकडाउननंतर तब्बल दीड वर्षांनंतर बुधवारपासून कॉलेजे प्रत्यक्ष सुरू होणार आहेत. सर्व कॉलेजे मुलांच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून त्यासाठी त्यांनी जय्यत तयारी केली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला राज्य सरकारने पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग प्रत्यक्ष सुरू केले. यानंतर कॉलेजे प्रत्यक्ष कधी सुरू होणार, यावर चर्चा सुरू झाली. 'मटा'नेही सुरू होणे कसे आवश्यक आहेत आणि ते प्रत्यक्ष कसे शक्य आहे, याबाबतचे वृत्त दिले होते. यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने याबाबत निर्णय जाहीर करत २० ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये शहरातील इंजिनीअरिंग, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे वर्ग सुरू होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या दोन्ही लसमात्रा झाल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी कॉलेजांनी लसीकरण शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचनाही सरकारने दिल्या आहेत. कॉलेज संकुलांचे निर्जंतुकीकरण करण्याबाबतही सांगण्यात आले आहे. या सर्व दृष्टीने कॉलेजांनी तयारीस सुरुवात केली आहे. अनेक कॉलेजांनी आपल्या कॉलेजातील शिक्षक आणि कर्मचारी यांच्या लसीकरणाचा तपशील मागविला आहे. सुमारे ९० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. याचबरोबर ५० टक्के क्षमतेने कॉलेज सुरू करावयाचे असल्यामुळे नमके कसे नियोजन करण्यात यावे, याबाबतही कॉलेज प्रशासन आणि प्राचार्य नियोजन करत आहेत. बहुतांश कॉलेजांमध्ये निर्जंतुकीकरण प्रक्रिया यापूर्वी पूर्ण झाली आहे. असे असले, तरी बुधवारच्या आधी आणखी एकदा ही प्रकिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्राचार्यांनी सांगितले. दक्षिण मुंबईतील एका कॉलेजने विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना कॉलेजकडून काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेतले आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी आम्ही आमची काळजी घेण्यासाठी सर्व उपायायोजना स्वत: करू, मात्र लवकरात लवकर कॉलेज सुरू करून प्रत्यक्ष वर्गात शिक्षण मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 'कॉलेज सुरू होणे ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे, तब्बल दीड वर्षांनी आम्ही आमच्या मित्रांना भेटणार आहोत. गतवर्षी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले बहुतांश विद्यार्थी हे तब्बल एक वर्षानंतर आपल्या वर्गमित्रांना भेटणार आहेत. यामुळे आम्हाला विशेष आनंद होत आहे,' असे एसपी कॉलेजचा विद्यार्थी संकेत पाटीलने सांगितले. ऑनलाइन शिक्षणात इंजिनीअरिंगच्या संकल्पना समजून घेणे अवघड जाते. प्रत्यक्ष यंत्र पाहिल्याशिवाय त्याचे ज्ञान मिळणे अवघड असते, असेही तो म्हणाला. मिश्र शिक्षणपद्धती प्रत्यक्ष वर्ग आणि ऑनलाइन वर्ग अशा दोन्ही पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्राचार्यांकडून सांगण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांची एक लसमात्रा घेऊन झाली आहे, अशांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरूच राहील, असेही प्राचार्य सांगतात. यामुळे वर्गाचे लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यासाठी काही कॉलेजांनी तयारी केल्याचेही सांगण्यात येत आहे. मटा भूमिका लसीकरणाला प्राधान्य हवे प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले बहुतांश विद्यार्थी हे १८ वर्षे पूर्ण झालेले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र जे विद्यार्थी लसीकरण करून घेऊ शकलेले नाहीत, त्यांचे लसीकरण प्राधान्याने करणे ही शासनाची तसेच कॉलेजांची प्रमुख जबाबदारी आहे. यासाठी शिक्षक, प्रशासनाने पुढाकार घेऊन त्यांचे लसीकरण प्राधान्याने करणे आवश्यक आहे. असे झाले, तरच कॉलेज सुरू करणे अधिक सुरक्षित होऊ शकते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3n7J4s9
via nmkadda

0 Response to "विद्यार्थ्यांसाठी कॉलेजे सज्ज; दीड वर्षांनंतर फुलणार कट्टे Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel