Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १८, २०२१ WIB
Last Updated 2021-10-18T06:43:48Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

आयआयटी मुंबईतर्फे UCEED २०२२ नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ Rojgar News

Advertisement
2022: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने अंडरग्रॅज्युएट एक्झामिनेशन फॉर डिझाइन (UCEED) २०२२ च्या नोंदणीला मुदतवाढ दिली आहे. याआधी १७ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करता येत होती. पण आता २४ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. या उमेदवारांनी अद्याप नोंदणी केली नसेल ते UCEED ची अधिकृत वेबसाइट uceedapp.iitb.ac.in वर अर्ज करु शकतात. UCEED 2022: नोंदणीसाठी स्टेप्स फॉलो करा स्टेप्स १ : UCEED च्या अधिकृत वेबसाइट https://ift.tt/3j9K5OU जा . स्टेप्स २: होमपेजवर उपलब्ध असलेल्या 'रजिस्टर' टॅबवर क्लिक करा. स्टेप्स ३: नवीन पेज खुले झाल्यावर नोंदणीकृत प्रमाणपत्रे अपलोड करा आणि 'सबमिट' बटण दाबा. स्टेप्स ४: आता आवश्यक तपशील भरुन अर्ज भरा. स्टेप्स ५: ऑनलाइन शुल्क भरा आणि भरलेला UCEED फॉर्म सबमिट करा. भविष्यातील उपयोगासाठी अर्जाची प्रिंट घ्या. महत्वाच्या तारखा: नियमित शुल्कासह ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख - २४ ऑक्टोबर २०२१ विलंब शुल्कासह ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख - २९ ऑक्टोबर २०२१ प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख - ८ जानेवारी २०२२ नंतर प्रवेशपत्रात बदल करण्याची शेवटची तारीख - १४ जानेवारी २०२२ (संध्याकाळी ५ वाजता) UCEED 2022 परीक्षेची तारीख - २३ जानेवारी २०२२ अंतिम उत्तरतालिका जाहीर - ३१ जानेवारी २०२२ निकालाची घोषणा - १० मार्च २०२२ UCEED परीक्षेबद्दल जाणून घ्या UCEED ही डिझाईन प्रवेश परीक्षा आहे, IIT मुंबई, गुवाहाटी, दिल्ली, IITDM जबलपूर आणि हैदराबाद मध्ये BEDS प्रवेशास उमेदवारांची निवड करण्यासाठी आयोजित केली जाते. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर आणि वर्षातून एकदा आपल्या देशातील २४ शहरांमध्ये घेतली जाते. २०२१ मध्ये बारावी किंवा त्याच्या समकक्ष किंवा २०२२ मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार UCEED साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. UCEED उत्तीर्ण झालेले विद्यार्थीच वरील संस्थांमध्ये BDS कार्यक्रमांना प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. लक्षात ठेवा की तात्पुरती वाटप केलेली जागा मागे घेण्याची किंवा रद्द करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी २५ ऑक्टोबर रोजी किंवा त्यापूर्वी त्यांची सीट मागे घेतली किंवा रद्द केली आहे त्यांना सीट स्वीकृती शुल्काचा परतावा मिळेल पण त्यांचे प्रक्रिया शुल्क कापले जाईल. नमूद केलेल्या बँक खात्यावर रिफंड पाठवले जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pcS0ik
via nmkadda