Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २७, २०२१ WIB
Last Updated 2021-10-27T09:43:44Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News

Advertisement
BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी शोधणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. या कंपनीतर्फे ७३ अप्रेंटिस पदांच्या भरती केली जाणार आहे. अप्रेंटिस पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील () अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार बोर्ड ऑफ अप्रेंटिस ट्रेनिंगच्या अधिकृत वेबसाइट boat-srp.com वर माहिती मिळवू शकतात. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड(BEL) ने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, या पदांसाठी २५ ऑक्टोबर २०२१ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना BEL च्या वेबसाइटवर यासाठी अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये पात्रता आणि शुल्काचा तपशील जाणून घेऊ शकता. महत्त्वाच्या तारखा अर्ज सुरू होण्याची तारीख: २५ ऑक्टोबर २०२१ NATS पोर्टलवर नावनोंदणीची शेवटची तारीख – १० नोव्हेंबर २०२१ अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ नोव्हेंबर २०२१ निवडलेल्या उमेदवारांच्या यादीचे प्रकाशन – ३० नोव्हेंबर २०२१ निवडलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी - ८ डिसेंबर आणि ९ डिसेंबर २०२१ असा करा अर्ज यामध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट recruitment portal- boat-srp.com वर जा. वेबसाइटच्या होमपेजवर जाऊन जॉब रिक्रूटमेंटवर क्लिक करा. आता च्या पर्यायावर जा. पुढील पानावर Apply Now वर क्लिक करा. त्यानंतर लिंकवर क्लिक करा. आता नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. नोंदणी केल्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता. अशी होईल निवड ऑनलाइन अर्जात दिलेल्या गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडलेल्या उमेदवारांची यादी तयार केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना त्यांच्या ईमेल आयडीवर यासंदर्भात सूचना दिली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी चेन्नईला जावे लागेल. पात्रता या रिक्त पदासाठी (BEL Recruitment 2021) जाहीर करण्यात आलेल्या सूचनेनुसार, ग्रॅज्युएट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इंजिनीअरिंग किंवा टेक्निकल पदवी असणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे टेक्निकल डिप्लोमा अप्रेंटिससाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा आणि पात्रतेबद्दल संपूर्ण माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pHzQWu
via nmkadda