फक्त टीव्ही पाहायचा आणि झोप काढायची नोकरी! पगार २५ लाख रुपये!! Rojgar News

फक्त टीव्ही पाहायचा आणि झोप काढायची नोकरी! पगार २५ लाख रुपये!! Rojgar News

ऑफिसचं काम करताना प्रत्येकाच्या मनात हा विचार एकदा तरी डोकावून जातोच की आरामाची नोकरी असती तर किती बरं झालं असतं. कामही करावं लागलं नसतं आणि पैसेही वेळेत मिळाले असते.... पण स्वप्न पाहतानाही त्यातली अशक्यता लक्षात येते. पण आम्ही तुम्हाला अशा नोकरीबद्दल माहिती देत आहोत...तुमचा विश्वास बसणार नाही, पण खरंच अशी नोकरी आहे. ब्रिटन (Britain) ची एक अशी कंपनी आहे, जी तुम्हाला अंथरुणात पडून राहण्याचे पैसे देणार आहे. इतकेच नाही तुमची टीव्ही पाहण्याची व्यवस्था देखील कंपनी करणार आहे. आहे की नाही मज्जा? तिथल्या लोकांनी तर या नोकरीसाठी रांगा लावल्या असतील. युके मिरर के अनुसार, लक्झरी बेड कंपनी क्राफ्टेड बेड्स (Crafted Beds)ने ही नोकरीची संधी दिली आहे. ही नोकरी जॉइन करणाऱ्या व्यक्तीला दर दिवशी ६ ते ७ तास बिछान्यात झोपून राहायचे आहे. ही नोकरी आहे मेट्रेस टेस्टरची. या मेट्रेस टेस्टरचं काम असणार कंपनीच्या या गाद्यांवर झोपायचं आणि त्याचा रिव्ह्यू द्यायचा. या पोस्टसाठी वार्षिक पॅकेज आहे २५ लाख रुपये! क्राफ्टेड बेड्सचे मार्केटिंग मॅनेजर ब्रायन डिलन यांनी सांगितले,'या नोकरीसाठी ऑफिसची देखील आवश्यकता नाही. कंपनी तुमच्यापर्यंत मॅट्रेस पोहोचवण्याची व्यवस्था करेल. तु्हाला केवळ दर आठवड्याला मॅट्रेसची माहिती द्यायची आहे. जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहिता येत असेल तर ही नोकरी तुमच्यासाठी आहे.' या नोकरीसाठी ब्रिटिश नागरिकत्व अनिवार्य आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vqpn2b
via nmkadda

0 Response to "फक्त टीव्ही पाहायचा आणि झोप काढायची नोकरी! पगार २५ लाख रुपये!! Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel