Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १२, २०२१ WIB
Last Updated 2021-10-12T10:43:27Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

स्टाफ सिलेक्शनतर्फे औद्योगिक सुरक्षा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती Rojgar News

Advertisement
SSC : कर्मचारी निवड आयोगातर्फे (SSC) आणि दिल्ली पोलीसमध्ये उपनिरीक्षक, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सहाय्यक उपनिरीक्षक पदांची भरती परीक्षा २०१९ च्या माध्यमातून केली जाणार आहे. स्टाफ सिलेक्शनतर्फे पदभरतीची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. १२ ऑक्टोबर २०२१ ला जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार एसएससी सीपीओ २०१९ परीक्षेच्या माध्यमातून विविध पोलीस आणि निमलष्करी दलांमध्ये एकूण २७४५ पदे भरली जाणार आहेत. यासाठी उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसात उपनिरीक्षक पुरुषांसाठी १३२ आणि महिलांसाठी ७९ जागा रिक्त आहेत. त्याचप्रमाणे, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs) च्या बाबतीत, एकूण २५४३ उपनिरीक्षक रिक्त पदांसाठी उमेदवारांची अंतिम निवड SSC २०१९ परीक्षेद्वारे केली जाणार आहे. यापैकी केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) सर्वाधिक १०७२ जागा आहेत. त्यापैकी १०४० जागा पुरुष उमेदवारांसाठी, ३२ जागा महिलांसाठी आहेत. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) उपनिरीक्षकांच्या ६११ जागा जाहीर केल्या असून त्यापैकी ५८० पुरुष आणि ३१ महिला उमेदवारांच्या जागा रिक्त आहेत. एसएससीच्या सूचनेनुसार, इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) मध्ये ६१ उपनिरीक्षक रिक्त जागांची घोषणा करण्यात आली आहे. त्यापैकी ५२ पुरुष उमेदवारांसाठी आणि ९ महिलां पदाच्या जागा रिक्त आहेत. त्याचप्रमाणे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) एकूण ६९२ उपनिरीक्षक पदांसाठी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यापैकी ६२३ पुरुष उमेदवारांसाठी आणि ६९ महिला उमेदवारांसाठी आहेत. शेवटी सशस्त्र सीमा दला (SSB) मध्ये एकूण ९८ उपनिरीक्षक पदे आहेत. त्यापैकी ७० पुरुष उमेदवारांसाठी आणि २८ महिलांसाठी आहेत. आयोगाने SSC CPO २०१९ परीक्षेद्वारे भरल्या जाणाऱ्या एकूण रिक्त पदांचे श्रेणीनिहाय विभाजन देखील जाहीर केले. जे उमेदवार आयोगाच्या SSC CPO २०१९ च्या रिक्त पदांच्या नोटिफिकेशनमध्ये तपासू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30cIAJb
via nmkadda