भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती, १ लाख ४५ हजारपर्यंत मिळेल पगार Rojgar News

भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती, १ लाख ४५ हजारपर्यंत मिळेल पगार Rojgar News

SAI Recruitment 2021: भारतीय क्रीडा प्राधिकरण, नवी दिल्ली (SAI) येथे विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, पगार याचा तपशील देण्यात आला आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरणात सीनियर लीड, लीड आणि स्पोर्ट्स असोसिएट पदाच्या एकूण १५ जागा भरण्यात येणार आहेत. ही भरती दोन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. त्यानंतर पदाची गरज ओळखून हा कालावधी १ वर्षासाठी वाढविला जाऊ शकतो. सीनियर लीडच्या ४ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत असून यापदासाठी निवडल्या गेलेल्या उमेदवारास ८० हजार, ते १ लाख ४५ हजार रुपये दरमहा पगार दिला जाणार आहे. लीड (रिसर्च) पदाच्या ६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४५ हजार ते ६० हजार रुपये पगार दिला जाणार आहे. स्पोर्ट असोशिएट पदाच्या ५ जागा रिक्त आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ४० हजार ते ५० हजार रुपये पगार दिला जाणार आहे. या पदासाठी उमेदवाराकडे स्पोर्ट/ लॉ/ मॅनेजमेंट यापैकी पदवी असणे गरजेचे आहे. बीटेक/एमबीए किंवा त्या समकक्ष टेक्नोलॉजीचे ज्ञान असणे गरजेचे आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठात स्पोर्ट्स मॅनेजमेंट विषयात २ वर्षांचा स्पोर्ट्स मॅनेजमेंट डिप्लोमा असणे गरजेचे आहे. स्पोर्ट्स अॅनालिस्ट/रिसर्च/मॅनेजमेंट याचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://ift.tt/3jcDWCc वर जाऊन अर्ज करायचा आहे. ८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30GP7Mw
via nmkadda

0 Response to "भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती, १ लाख ४५ हजारपर्यंत मिळेल पगार Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel