TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Career in Share Market: शेअर मार्केटमध्ये नोकरीचे अनेक पर्याय, करा मोठी कमाई Rojgar News

Career in Share Market: स्टॉक मार्केट, स्टॉक एक्सचेंज, स्टॉक ब्रोकर, निफ्टी आणि सेन्सेक्स या तुमच्या आवडीच्या गोष्टी असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. भारतातील शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शेअर बाजार गुंतवणूक हा खेळ नाही. मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला त्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अनेकांना पैसे गुंतवणूक करायची असते पण त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ नसतो. यासाठी लोकांना गुंतवणुकीचा सल्ला देऊन चांगले पैसे कमावू शकता. या क्षेत्रात रस असेल तर तुमचे करिअर या क्षेत्रात करु शकता. गुंतवणूकदार आणि शेअर बाजारामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला स्टॉक ब्रोकर म्हणतात. या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी आहेत.स्टॉक ब्रोकर हा स्टॉक एक्सचेंज आणि गुंतवणूकदार यांच्यातील दुवा म्हणून काम करतो. ब्रोकरशिवाय कोणत्याही गुंतवणूकदाराला शेअर बाजारात सर्वोत्तम कामगिरी देणे अवघड असते. स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी डिमॅट खाते आवश्यक आहे आणि ब्रोकरशिवाय तुम्ही डिमॅट खाते उघडू शकत नाही. स्टॉक ब्रोकरचे २ प्रकार पूर्ण वेळ स्टॉक ब्रोकर (Full Service Stock Broker) पूर्ण वेळ स्टॉक ब्रोकर आपल्या ग्राहकाला कोणते शेअर्स खरेदी करायचे आणि कधी विकायचे?, स्टॉक खरेदी करण्यासाठी मार्जिन, मोबाइल फोनवर ट्रेडिंग सुविधा आणि IPO गुंतवणुकीची सुविधा देतात. या सेवेसाठी विशिष्ट शुल्क आकारले जाते. पूर्णवेळ स्टॉक ब्रोकरची ग्राहक सेवा खूप फायदेशीर मानली जाते. डिस्काउंट स्टॉक ब्रोकर (Discount Stock Broker) डिस्काउंट स्टॉक ब्रोकर त्यांच्या क्लायंटकडून अत्यंत कमी ब्रोकरेज घेऊन शेअर्स खरेदी आणि विक्री करण्याची सुविधा देतात. त्यांची फी कमी असते. डिस्काउंट स्टॉक ब्रोकर त्यांच्या क्लायंटना स्टॉक अॅडव्हायझरी आणि रिसर्चची सुविधा देतात. डिस्काऊंट स्टॉक ब्रोकरकडून एखाद्याचे खाते उघडण्यापासून ते त्यांचे बहुतांश काम ऑनलाइन केले जाते. आवश्यक पात्रता स्टॉक ब्रोकर होण्यासाठी तुम्ही विविध कोर्स करू शकता. स्टॉक ब्रोकर्सला कॉमर्स, अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक्स किंवा बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. या विषयांमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. NCFM कोर्सेस हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा ऑनलाइन प्रमाणपत्र कार्यक्रम आहे. नोकरी शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारे उमेदवारांना इक्विटी डीलर्स, इक्विटी ट्रेडर्स, इक्विटी सल्लागार, स्टॉक अॅडव्हायझर्स, वेल्थ मॅनेजर, फायनान्शिअल एनालिस्ट, गुंतवणूक सल्लागार, सिक्योरिटी एनालिस्ट आणि रिस्क मॅनेजर म्हणून नोकरी करता येऊ शकते. या क्षेत्रात तुम्हाला स्टॉक एक्स्चेंज, रेग्युलेशन अथॉरिटी, फॉरेन इन्व्हेस्टमेंट फर्म्स, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी, म्युच्युअल फंड कंपनी, ब्रोकर फर्म्स, इन्शुरन्स एजन्सी, बँक आणि इतर संस्थांमध्ये नोकरीची खूप चांगली संधी आहे. पूर्णवेळ स्टॉक ब्रोकर म्हणून तुम्ही करिअर करु शकता. या क्षेत्रात तुम्हाला वर्षाला २ लाख ते ८ लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CwZr74
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या