CBSE, ICSE विद्यार्थ्यांची सुप्रीम कोर्टात धाव, परीक्षेसंदर्भात केली मोठी मागणी Rojgar News

CBSE, ICSE विद्यार्थ्यांची सुप्रीम कोर्टात धाव, परीक्षेसंदर्भात केली मोठी मागणी Rojgar News

CISCE Term 1 : आणि दहावी आणि बारावी टर्म परीक्षा केवळ ऑफलाइन माध्यमातून होणार आहेत. या परीक्षा ऑनलाइन माध्यमातून देण्याचा पर्याय असावा या मागणीसाठी काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सीबीएसई आणि आयसीएसई दहावी आणि बारावी टर्म परीक्षा केवळ ऑफलाइन माध्यमातून होण्याच्या निर्णयाविरोधात दहावी, बारावीच्या ६ विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही परीक्षा हायब्रीड पद्धतीने घेण्याबाबत तातडीने निर्देश देण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी याचिकेद्वारे केली आहे. सीबीएसईच्या परीक्षा १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत तर आयसीएसईच्या परीक्षा २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. परीक्षेला काही दिवस शिल्लक राहिले असताना ही याचिका दाखल झाल्याने परीक्षेचा अभ्यास करणारे इतर विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे साऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. ऑफलाइन परीक्षेमुळे करोना संसर्गाचा धोका झपाट्याने वाढेल आणि हे आरोग्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे असे याचिकेत म्हटले आहे. परवानगी घेतल्याशिवाय ऑफलाइन परीक्षांना बोलावणे हे मनमानी आणि बेकायदेशीर असल्याचे याचिकेमध्ये म्हटले आहे. हायब्रीड माध्यमातून परीक्षा घेणे ही काळाची गरज आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल आणि यंत्रणांवर पडणारे ओझे देखील कमी होईल असे यामध्ये याचिकेत म्हटले आहे. डिसेंबर २०२१ मध्ये प्रमुख विषयांच्या परीक्षा तीन आठवडे असणार आहेत त्यामुळे याचिकाकर्त्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यानंतर परीक्षांवर पडणाऱ्या परिणामाबद्दल प्रचंड भीती वाटते. डिसेंबर २०२१ मध्ये प्रमुख विषयांच्या परीक्षेपूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये ऑफलाइन माध्यमातून इतर विषयांच्या परीक्षा आहेत. चुकीची माहिती आणि बळजबरी करून संमती मिळवली जात असल्याचे मत अनेक विद्यार्थ्यांनी नोंदविल्याचे याचिकेमध्ये म्हटले आहे. परीक्षेतील गैरप्रकारांवर असणार बोर्डाची नजर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) परीक्षांमधील संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी अॅडव्हान्स्ड डेटा अॅनालिस्ट ( Advanced Data Analytics) वापर केला जाणार आहे. यामुळे परीक्षा पारदर्शी होण्यास मदत होणार आहे. सीबीएसईचे आयटी संचालक अंत्रिक जोहरी यांनी यासंदर्भात माहिती दिली. या परीक्षा प्रमाणबद्ध आणि निष्पक्ष पद्धतीने घेतल्या जातील असेही ते म्हणाले. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरप्रकार करण्यापासून रोखण्यासाठी बाहेरील पर्यवेक्षक आणि भरारी पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. यासोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे परीक्षा केंद्रांमध्ये लक्ष ठेवले जाणार आहे. CBSE टर्म १ च्या परीक्षा १६ नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. गैरप्रकार होण्याची अधिक शक्यता असणाऱ्या परीक्षाकेंद्रांमध्ये अॅडव्हान्स्ड डेटा अॅनालिस्टच्या मदतीने सुधारणा केली जाणार असल्याचे जोहरी यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांना परीक्षेतून सवलत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, (CBSE) कडून दहावी आणि बारावी टर्म १ बोर्ड परीक्षेपूर्वी बोर्डाने विद्यार्थ्यांना महत्वाची नोटीस बजावली आहे. दहावी-बारावीच्या टर्म १ परीक्षेला बसलेल्या आणि आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही. अशा विद्यार्थ्यांचा निकाल टर्म २ च्या परीक्षेच्या आधारे लावला जाईल असे या निर्देशांमध्ये म्हटले आहे. सीबीएसईची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जाऊन विद्यार्थी जाहीर करण्यात आलेले नोटिफिकेशन पाहू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wCdXsM
via nmkadda

0 Response to "CBSE, ICSE विद्यार्थ्यांची सुप्रीम कोर्टात धाव, परीक्षेसंदर्भात केली मोठी मागणी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel