Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १५, २०२१ WIB
Last Updated 2021-11-15T05:43:41Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE बोर्डाच्या टर्म १ परीक्षांसाठी महत्वाचे निर्देश Rojgar News

Advertisement
Exam: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSE) दहावी आणि बारावीसाठी यावर्षी दोन टप्प्यात परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यातील टर्म १ परीक्षा १६ नोव्हेंबर २०२१ पासून होणार आहेत. सीबीएसई बोर्डाच्या वेळापत्रकानुसार, इयत्ता बारावीच्या मायनर विषयांचे पेपर १६ नोव्हेंबरपासून आणि दहावीचे पेपर एक दिवसानंतर १७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. बारावीची टर्म १ ची परीक्षा इंटरप्रिन्योरशिप, ब्युटी आणि वेलनेस या पेपरने सुरू होईल. तर दहावीची परीक्षा पेंटिंगच्या पेपरसह सुरू होईल.नसीबीएसईने टर्म १ च्या परीक्षांसाठी अनेक सूचना जाहीर केल्या आहेत. विद्यार्थ्यांना या सूचनांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. CBSE बोर्ड टर्म १ च्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याच्या किमान १ तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचले पाहिजे. हिवाळा असल्यामुळे सर्व परीक्षा सकाळी ११.३० वाजता सुरू होतील. विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरमध्ये आधीच्या १५ मिनिटांऐवजी २० मिनिटे वाचनासाठी वेळ मिळेल. परीक्षेच्यावेळी सीबीएसई दहावी/बारावीचे प्रवेशपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी मास्क घालावे, सॅनिटायझर बाळगावे आणि संसर्गाचा संभाव्य प्रसार टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळावे. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. विद्यार्थ्यांनी ओएमआर शीट भरताना स्वतःची ओळख पटवून द्यावी. विद्यार्थी करोनामुळे, कोणत्याही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड, आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी असल्याने परीक्षेत बसू शकत नसेल तर त्यांनी तातडीने त्यांच्या शाळेत कळवावे. जेणेकरुन आवश्यक कार्यवाही करता येईल. बोर्ड परीक्षेचा अंतिम निकाल टर्म २ परीक्षा संपल्यानंतरच जाहीर केला जाईल. OMR शीट संदर्भात निर्देश सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी दहावी आणि बारावीच्या टर्म-१ परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना OMR (ऑप्टिकल मार्क रिकग्निशन) शीट समजावून सांगण्याचे निर्देश बोर्डाने दिले आहेत. सीबीएसईच्या नोटिसमधील माहितीनुसार, सीबीएसई पहिल्यांदाच दहावी आणि बारावीच्या मूल्यांकनासाठी ओएमआर पद्धतीचा वापर करणार आहे. त्यामुळे परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी आणि शाळांना ओएमआर बद्दल पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. ओएमआर शीट नीट समजावी यासाठी शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सराव सत्र आयोजित करण्याचा सल्ला बोर्डातर्फे देण्यात आला आहे. महत्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांचा तपशील ओएमआरमध्ये भरला जाईल. विद्यार्थ्याने ओएमआर शीटवर दिलेल्या जागेत वरच्या उजव्या कोपर्‍यात प्रश्नपत्रिकेचा कोड लिहायचा आहे. प्रश्नपत्रिकेवर प्रश्नपत्रिका कोड दिलेला असेल. 'वर दिलेले सर्व तपशील बरोबर आहेत असे लिहून ओएमआरवर सही करा. माहिती भरण्यासाठी आणि अभिप्राय देण्यासाठी फक्त निळ्या किंवा काळ्या बॉल पॉइंट पेनचा वापर करावा. पेन्सिल वापरण्यास सक्त मनाई आहे. ओएमआर भरण्यासाठी विद्यार्थ्याने पेन्सिलचा वापर केल्याचे आढळून आल्यास, तो अनुचित मार्गाचा वापर मानला जाईल. परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3onRnR4
via nmkadda