CBSE टर्म १ बोर्ड परीक्षेसाठी विविध पदांची तात्काळ भरती Rojgar News

CBSE टर्म १ बोर्ड परीक्षेसाठी विविध पदांची तात्काळ भरती Rojgar News

Term 1 board exams 2022: सीबीएसई बोर्ड टर्म १ च्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. याअंतर्गत सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. सीबीएसई बोर्डातर्फे लवकरच नववी आणि दहावीच्या परीक्षा देखील सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या शिक्षण विभागातर्फे सीबीएसई बोर्ड परीक्षांसाठी विविध पदांची भरती केली जाणार आहे. सीबीएसई टर्म १ परीक्षेसाठी टीजीटी, पीजीटी सह आयटी सहाय्यक/डिईओ ही पदे भरली जाणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनेही यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यानुसार सीबीएसई दहावी-बारावीची परीक्षा १६ नोव्हेंबरपासून आणि नववी-अकरावीच्या परीक्षा १ डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. इयत्ता नववी आणि अकरावीच्या होणाऱ्या परीक्षा लक्षात घेऊन करोना ड्युटीसाठी टीजीटी, पीजीटी आणि आयटी सहाय्यक/डीईओची परीक्षा नियंत्रक पदाची भरती केली जाणार आहे. सर्व डीडीई जिल्हा, विभागीय डीडीई आणि एचओएस यांना नववी ते बारावीच्या संबंधित शिक्षकांना आणि सर्व आयटी सहाय्यक/डीईओ यांनी ताबडतोब रिपोर्ट करावा. यामुळे बोर्डाची परीक्षा सुरळीत सुरू राहीलं असे दिल्लीचे शिक्षण संचालक हिमांशू गुप्ता यांनी सांगितले. दहावीच्या मुख्य विषयांसाठी सीबीएसई टर्म १ च्या परीक्षा ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तर बारावीच्या मुख्य विषयांसाठी सीबीएसई टर्म १ बोर्ड परीक्षा १ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. सीबीएसईतर्फे दोनदा बोर्ड परीक्षा आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यानुसार पहिल्या टर्मच्या परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आणि टर्म २ च्या परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये होणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xdv44H
via nmkadda

0 Response to "CBSE टर्म १ बोर्ड परीक्षेसाठी विविध पदांची तात्काळ भरती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel