Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २३, २०२१ WIB
Last Updated 2021-11-23T10:43:37Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

एकाच शाळेत ११ विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह; व्यवस्थापनाने तत्काळ केली शाळा बंद Rojgar News

Advertisement
करोना संक्रमण दुसऱ्या लाटेनंतर देशभरात उसंत घेत आहे. मात्र दुसरीकडे एका शाळेत ११ विद्यार्थ्यांना कोविड-१९ संक्रमण झाल्याची घटना घडली आहे. यानंतर सावध झालेल्या शाळेने तत्काळ ऑफलाइन वर्ग बंद केले आहेत. राजस्थानातील जयपूर येथील जयश्री पेडीवाल इंटरनॅशनल स्कूलमध्ये हा प्रकार घडला. एकाच वेळी ११ विद्यार्थी करोना संक्रमित आढळल्याने शाळा प्रशासन चिंतेत पडले आहे. मंगळवारी हा प्रकार समोर आला. यापूर्वी तेलंगण मधील खम्मम जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळेत २८ विद्यार्थी करोना संक्रमित असल्याचे आढळून आले होते. जयपूरमधील आणखी दोन शाळांमधील विद्यार्थी देखील मागच्याच आठवड्यात कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. नीरजा मोदी स्कूल आणि महाराज सवाई मानसिंग विद्यालय या दोन शाळांमध्ये एक-दोन विद्यार्थी असल्याचे आढळून आले आहे. देशभरात दुसरी लाट ओसरल्यानंतर, दिवाळीनंतर शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र एकीकडे जनजीवन सुरळीत होत असताना, लोकांच्या मनातली करोनाविषयीची भीती कमी होऊन ती जागा बेफिकिरीने घ्यायला सुरूवात केली आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे नियम हळूहळू पायदळी तुडवले जाऊ लागले आहेत. परिणामी अशा करोना संक्रमणाच्या घटना तुरळक असल्या तरी चिंता वाढवणाऱ्या आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r3Jeo0
via nmkadda