Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २३, २०२१ WIB
Last Updated 2021-11-23T11:43:13Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NIT, IIIT प्रवेशासाठी स्पेशल राउंड काऊन्सेलिंग, नोंदणी प्रक्रिया जाणून घ्या Rojgar News

Advertisement
CSAB Counseling 2021: सेंट्रल सीट अलॉकेशन बोर्डा (CSAB) द्वारे इंजिनीअरिंग यूजी प्रवेशासाठी स्पेशल राउंड काऊन्सेलिंग घेतली जाणार आहे. हा स्पेशल राउंड एनआयटी, IIITडसहीत इतर सरकारी सहाय्य केंद्रीय संस्थांमध्ये (GFTI) जोसा काउंसलिंग २०२१ (JoSAA Recruitment 2021) नंतर राहीलेल्या जागांवरील प्रवेशासाठी आयोजित केला जाईल. सीसॅब काऊन्सेलिंग २०२१ (CSAB 2021 Counseling) चा पूर्ण तपशील अधिकृत वेबसाइट csab.nic.in वर देण्यात आला आहे. उमेदवारांना बातमीखाली देण्यात आलेल्या थेट लिंकवरुन पूर्ण वेळापत्रक पाहता येणार आहे. महत्वाच्या तारखा सर्व एनआयटी, आणि जीएफटीआयमध्ये कुठे? किती? जागांवरील प्रवेशासाठी सीएसएबी काऊन्सेलिंग २०२१ () होणार हे २७ नोव्हेंबर २०२१ रोजी अधिकृत वेबसाइट csab.nic.in वर जाहीर केले जाणार आहे. स्पेशल राउंडसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची सुरुवात २८ नोव्हेंबर २०२१ पासून होणार आहे. उमेदवारांना ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत रिपोर्टिंग करण्याची संधी आहे. सीसॅब २०२१ सीट अलॉटमेंट रिझल्टची घोषणा २ डिसेंबरला केली जाणार आहे. सीट अलॉटमेंट रिझल्ट जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना दिलेली सीट बुक करण्यासाठी, स्लाइड किंवा फ्लोट करण्यासाठी पर्याय दिला जाईल. ही प्रक्रिया २ डिसेंबर २०२१ ते ४ डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करता येईल. यानंतर सीएसएबी सीट अलॉटमेंट राउंड २ रिझल्टची घोषणा डिसेंबर २०२१ मध्ये केली जाईल. सीट एक्सेप्ट, फीस पेमेंट, डॉक्यूमेंट अपलोड आणि रिस्पॉन्स करण्यासाठी अंतिम तारीख ९ डिसेंबर २०२१ आहे. या उमेदवारांना अधिक वेळ निवडलेल्या संस्थेत फिजिकल व्हेरिफिकेशन रिपोर्ट करण्यासाठी दिव्यांग उम्मीदवारांना अधिक वेळ देण्यात येईल. त्यांनी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या दिव्यांग स्टेटसची तपासणी केली जाईल. ज्या दिव्यांग उमेदवारांचे जोसा काऊन्सेलिंगदरम्यान फिजिकल व्हेरिफिकेशन झाले नाही. त्यांच्यासाठी सीसॅब फिजिकल व्हेरिफिकेशन प्रक्रिया थोडी वेगळी असेल. फिजिकल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया २८ नोव्हेंबर २०२१ पासून सुरु होईल. सीसॅब २०२१ स्पेशल राऊंड (CSAB 2021 special round) मध्ये सुरु राहील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r6Geaf
via nmkadda