Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १९, २०२१ WIB
Last Updated 2021-11-19T06:43:14Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Government Job: एनटीपीसीमध्ये विविध पदांची भरती, ६० हजारपर्यंत मिळेल पगार Rojgar News

Advertisement
Executive Recruitment 2021: इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना एनटीपीसीमध्ये मिळण्याची संधी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) तर्फे एक्झिक्युटिव्ह पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. एनटीपीसीतर्फे हायड्रो एक्झिक्युटिव्हच्या पदांवर ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. एनटीपीसीतर्फे यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अनुभव, थेट मुलाखतीचा तपशील नोटिफिकेशन देण्यात आला आहे. यासोबतच अर्जाचा नमुना देखील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदभरतीअंतर्गत एक्झिक्युटिव्ह (हायड्रो) पदांच्या १५ जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी पात्र उमेदवारांना ६० हजार रुपये पगार दिला जाणार आहे. यासोबतच उमेदवारांना इतर भत्ते देखील देण्यात येणार आहेत. पात्रता या पदासाठी उमेदवारांकडे मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीई किंवा बीटेक पदवी असणे गरजेचे आहे. या परीक्षेत उमेदवाराला किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे. पदवी अभ्यासक्रमानंतर एक वर्षाचा कामाचा अनुभवही असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्षे असणे गरजेचे आहे. आरक्षित प्रवर्गांतील उमेदवारांना सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत वयाची मोजणी केली जाईल. असा करा अर्ज NTPC नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट careers.ntpc.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी १६ नोव्हेंबर २०२१ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज शुल्क जनरल, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागास विभागातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ३०० रुपये आहे. एससी, एसटी, दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. उमेदवारांना नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा बँक चलनाद्वारे अर्ज शुल्क भरू शकता. निवड प्रक्रिया एक्झिक्युटिव्ह भरती २०२१ साठी पात्र उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाईल. या पदभरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CuywZK
via nmkadda