आयडॉलच्या नव्या MMS व MCA अभ्यासक्रमांसाठी परीक्षा अर्जांना सुरुवात Rojgar News

आयडॉलच्या नव्या MMS व MCA अभ्यासक्रमांसाठी परीक्षा अर्जांना सुरुवात Rojgar News

: मुंबई विद्यापीठाच्या () दूर व मुक्त अध्ययन संस्थेला () या शैक्षणिक वर्षांपासून AICTE व UGC ने एमएमएस (MMS) व एमसीए (MCA) हे दोन अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. या अभ्यासक्रमाचे प्रवेश परीक्षांचे अर्ज ऑनलाइन माध्यमातून शुक्रवार, १९ नोव्हेंबर २०२१ पासून सुरु होत आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०२१ आहे. एमएमएस व एमसीएची प्रवेश परीक्षा शुक्रवार ३ डिसेंबर २०२१ रोजी ऑनलाईन होणार आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांपासून एआयसीटीई व यूजीसीने आयडॉलला मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (MMS) या अभ्यासक्रमासाठी ७२० जागांची मान्यता दिली असून हा अभ्यासक्रम प्रथमच आयडॉलमधून दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु होत आहे. हा अभ्यासक्रम एमबीए या अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहे. तसेच आयडॉलमध्ये प्रथमच मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (MCA) हा दोन वर्षाचा सुधारित अभ्यासक्रम सुरु होत आहे. यापूर्वी हा अभ्यासक्रम तीन वर्षाचा होता. या अभ्यासक्रमाला एआयसीटीई व यूजीसीने २००० जागांची मान्यता दिली आहे. या दोन्ही प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाइन माध्यमातून मागविण्यात येत असून ते विद्यापीठाच्या https://ift.tt/34WfOvj या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. १९ नोव्हेंबर २०२१ पासून हे अर्ज ऑनलाईन उपलब्ध होत असून शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०२१ हि आहे. तर एमएमएस व एमसीए या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा शुक्रवार, ३ डिसेंबर २०२१ रोजी ऑनलाईन होणार आहे. या प्रवेश परीक्षेची सर्व माहिती विद्यापीठाच्या https://ift.tt/34WfOvj या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oLBHHB
via nmkadda

0 Response to "आयडॉलच्या नव्या MMS व MCA अभ्यासक्रमांसाठी परीक्षा अर्जांना सुरुवात Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel