Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १८, २०२१ WIB
Last Updated 2021-11-18T13:43:31Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

पिंपरी-चिंचवड पालिकेत विविध पदांची भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड Rojgar News

Advertisement
PCM : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, मुलाखतीचा पत्ता याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदभरतीसाठी उमेदवारांची कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागा अंतर्गत स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynecologist), बालरोगतज्ञ (Pediatrician), भूलतज्ज्ञ (Anesthesiologist), वैद्यकीय अधिकारी (Medical Officer), गुणवत्ता हमी सहाय्यक (Quality Assurance Assistant), स्टाफ नर्स (Staff Nurse), फार्मासिस्ट आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Pharmacist and Laboratory Technician) पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. पगार स्त्रीरोगतज्ज्ञच्या ३ जागा असून यासाठी ७५ हजार रुपये पगार देण्यात येणार आहे., बालरोगतज्ञच्या ४ जागा असून यासाठी ७५ हजार रुपये, भूलतज्ज्ञच्या ३ जागा रिक्त असून यासाठी ७५ हजार रुपये पगार, वैद्यकीय अधिकारीच्या १० रिक्त जागा असून यासाठी ६० हजार रुपये पगार, गुणवत्ता हमी सहाय्यकची एक जागा रिक्त असून यासाठी १८ हजार रुपये पगार, स्टाफ नर्स पदाच्या २५ जागा रिक्त असून यासाठी २० हजार रुपये पगार, फार्मासिस्टच्या ३ जागा रिक्त असून यासाठी १७ हजार रुपये पगार आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या ३ जागा रिक्त असून यासाठी १७ हजार रुपये पगार देण्यात येणार आहे. या पदभरतीसाठी सरकारनी नियमानुसार आरक्षण देण्यात येणार आहे. तसेच पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. मुलाखतीचा पत्ता उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या नमुन्यानुसार अर्ज भरायचा आहे. हा अर्ज दिलेल्या मुदतीपर्यंत पाठविणे गरजेचे आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांनी प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, पिंपरी चिंचवड येथे हजर राहणे गरजेचे आहे. दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी मुलाखत होणार आहे. यासाठी उमेदवारांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cpceOl
via nmkadda