Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १८, २०२१ WIB
Last Updated 2021-11-18T13:43:28Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Central Bank of India Recruitment 2021: सेंट्रल बँकेत ११५ पदांवर भरती Rojgar News

Advertisement
Bank Recruitment 2021: जे इच्छुक उमेदवार बँकेत नोकरी करण्याचं स्वप्नं पाहत आहेत, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (, CBI)विविध पदांवर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत सिक्युरिटी ऑफिसर, रिस्क मॅनेजर, फायनान्शिअल अॅनालिस्ट क्रेडिट ऑफिसर, इकॉनॉमिस्ट, डाटा सायंटिस्ट, टेक्निकल ऑफिसर, लॉ ऑफिसर, इनकम टॅक्स ऑफिसर सह अन्य पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण ११५ पदे भरणार आहे. जे उमेदवार या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करू इच्छितात, ते अधिकृत वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २३ नोव्हेंबर पासून सुरू होण्याची शक्यता आहे आणि ही प्रक्रिया १७ डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर ऑनलाइन अर्जांसाठी रजिस्ट्रेशन विंडो बंद होईल. Bank Recruitment 2021: महत्त्वाच्या तारखा ऑनलाइन अर्जांना सुरुवात - २३ नोव्हेंबर २०२१ ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख -१७ डिसेंबर २०२१ सीबीआय एसओ अॅडमिट कार्डाची तारीख (तात्पुरती) - ११ जानेवारी २०२१ सीबीआय एसओ परीक्षा - २२ जानेवारी २०२२ शैक्षणिक पात्रता Economist पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे बँकिंग/ कॉमर्स/ पब्लिक पॉलिसी सह अन्य विषयातील पीएचडी पदवी असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त व्यावसायिक बँकेत किमान ५ वर्ष कामााच अनुभव असणे आवश्यक आहे. इनकम टॅक्स ऑफिसर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे चार्ट्ड अकाउंट डिग्री असायला हवी. या व्यतिरिक्त किमान १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. डाटा सायंटिस्ट पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून Statistics/Econometrics/Mathematical/Finance/Economics/Co mputer Science मध्ये पीजी डिग्री असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त ८ ते १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. फायनान्शियल अॅनालिस्ट पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी CA/ICWA किंवा फायनान्स मध्ये MBA पर्यंतचे शिक्षण घेतलेले असावे. या व्यतिरिक्त संबंधित क्षेत्रात कामाचा तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त इतर विविध पदांच्या भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YZHTTx
via nmkadda