HCL टेक्नोलॉजीमध्ये होणार १० हजार पदांची भरती Rojgar News

HCL टेक्नोलॉजीमध्ये होणार १० हजार पदांची भरती Rojgar News

Recruitment: आपला व्यवसाय वाढविण्याच्या हेतूने १० हजार अधिक पदांची भरती करणार आहे. याद्वारे नव्या अमेझॉन वेब सर्व्हिस (Amazon Web Services, AWS) बिझनेस युनिट (AWS BU) ला चालना दिली जाणार आहे. यामुळे जगभरातील उद्योगांना त्यांच्या क्लाउड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये गती मिळण्यास मदत होणार आहे. यामाध्यमातून एचसीएल इंजिनीअरिंग, सोल्यूशन्स आणि बिझनेस टीम यांना सहकार्य करणार आहे. HCL कडे सध्या पाच AWS कंपन्या असून यामध्ये दहा हजार प्रशिक्षित कामगार आहेत. ही क्षमता २० हजार प्रोफेशनल्सपर्यंत वाढविण्याचा कंपनीचा विचार आहे. याद्वारे नवीन बिझनेस युनिट व्यवसायांना त्यांच्या लीगेसी सिस्टीम आणि मेनफ्रेम ऍप्लिकेशन्सचे आधुनिकीकरण करण्यास मदत केली जाणार आहे. तसेच क्लाउड तंत्रज्ञानाच्या मदतीने AWS वर SAP वर्कलोड्सचे व्यवस्थापन करुन कार्यक्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट्य साध्य केले जाणार आहे. 'HCL एक AWS प्रीमियर कन्सल्टींग पार्टनर आहे. जो ग्राहकांना पायाभूत सुविधा, ऍप्लिकेशन्स आणि डेटाच्या आधुनिकीकरणात मदत करतो. ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी पूर्ण सहकार्य करते' असे WW चॅनेल आणि अलायन्स AWSचे प्रमुख डग य्यूम म्हणाले. 'HCL AWS बिझनेस युनिट लाँच केल्यामुळे एचसीएल ही एफएसआय, टेल्को आणि ऊर्जा आणि युटिलिटीजवर आपले लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच SAP, कॉन्टॅक्ट सेंटर्स, हायब्रिड क्लाउड आणि मेनफ्रेम मॉर्डनायजेश यांवरील सखोल तांत्रिक कौशल्य वापरून व्यवसाय आणि ग्राहक वर्तनात बदल करता येणार असल्याचे ते म्हणाले. 'AWS BU हा आमच्या मोठ्या #HCLCloudSmart धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. याद्वारे क्लाउड डिलिव्हरीच्या प्रत्येक पैलूची सेवा देऊन आमच्या ग्राहकांना प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे राहण्यास मदत करणारी प्रभावी इकोसिस्टिम तयार केली जाईल' असे एचसीएल टेक्नॉलॉजीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आणि प्रमुख कल्याण कुमार यावेळी म्हणाले. 'एड्ब्ल्यूएस सोबतच्या आमच्या व्यापक संबंधांचा फायदा घेऊन, AWS BU डिजिटल, सांस्कृतिक आणि ग्राहक-केंद्रित परिवर्तने चालवून, दोन्ही कंपन्यांनी ऑफर केलेल्या सर्वोत्तम गोष्टींचा समन्वय साधेल असेही ते म्हणाले. AWS सेवा आणि गुंतवणुकीसह तयार केलेले कस्टमाइज इंडस्ट्री सॉल्युशन विकसित करून महसूल वाढ आणि ग्राहक अनुभव वाढण्याची अपेक्षा युनिटला आहे. नुकतेच HCL सोल्यूशनने 1PLM उत्पादक कंपनीच्या कॉम्प्युटर एडेड डिझाइन (CAD) आणि प्रोडक्ट लाइफ सायकल मॅनेजनमेंट(PLM)च्या पायाभूत सुविधा या मागणीनुसार, स्केलेबल आणि वेगाने बदलण्यास मदत केली ज्यामुळे व्यवसायात मदत झाली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/306befm
via nmkadda

0 Response to "HCL टेक्नोलॉजीमध्ये होणार १० हजार पदांची भरती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel