CBSE बोर्डातर्फे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर Rojgar News

CBSE बोर्डातर्फे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर Rojgar News

CBSE Exam 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) CBSE बोर्ड टर्म-१ परीक्षेशी संबंधित एक महत्त्वाची सूचना जाहीर केली आहे. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी दहावी आणि बारावीच्या टर्म-१ परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना OMR (ऑप्टिकल मार्क रिकग्निशन) शीट समजावून सांगण्याचे निर्देश बोर्डाने दिले आहेत. सीबीएसईच्या नोटिसमधील माहितीनुसार, पहिल्यांदाच दहावी आणि बारावीच्या मूल्यांकनासाठी ओएमआर पद्धतीचा वापर करणार आहे. त्यामुळे परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी आणि शाळांना ओएमआर बद्दल पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. ओएमआर शीट नीट समजावी यासाठी शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सराव सत्र आयोजित करण्याचा सल्ला बोर्डातर्फे देण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर बोर्डातर्फे पहिल्यांदाच दोन टप्प्यात परीक्षा घेतली जात आहे. सीबीएसई टर्म १ परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची असेल म्हणजे प्रश्नपत्रिकेत बहुपर्यायी प्रश्न असतील. तर टर्म-२ थीमॅटिक पद्धतीने होईल. दोन्ही परीक्षांमध्ये ५०-५० टक्के अभ्यासक्रम असणार आहे. महत्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांचा तपशील ओएमआरमध्ये भरला जाईल. विद्यार्थ्याने ओएमआर शीटवर दिलेल्या जागेत वरच्या उजव्या कोपर्‍यात प्रश्नपत्रिकेचा कोड लिहायचा आहे. प्रश्नपत्रिकेवर प्रश्नपत्रिका कोड दिलेला असेल. 'वर दिलेले सर्व तपशील बरोबर आहेत असे लिहून ओएमआरवर सही करा. माहिती भरण्यासाठी आणि अभिप्राय देण्यासाठी फक्त निळ्या किंवा काळ्या बॉल पॉइंट पेनचा वापर करावा. पेन्सिल वापरण्यास सक्त मनाई आहे. ओएमआर भरण्यासाठी विद्यार्थ्याने पेन्सिलचा वापर केल्याचे आढळून आल्यास, तो अनुचित मार्गाचा वापर मानला जाईल. परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mVQI9O
via nmkadda

0 Response to "CBSE बोर्डातर्फे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel