Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ८ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-11-08T10:43:51Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

आशियातील टॉप १०० मध्ये ७ भारतीय विद्यापीठांचा समावेश Rojgar News

Advertisement
QS Asia Rankings 2022: क्यूएस विद्यापीठ रॅंकिंग (QS Asia University Rankings 2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे. Quacquarelli Symonds (QS) ने आशियातील उच्च शैक्षणिक स्तरावर जगातील सर्वाधिक निवडल्या गेलेल्या विद्यापीठांची क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत सिंगापूरचे राष्ट्रीय विद्यापीठ सलग चौथ्या वर्षी आशियातील अव्वल विद्यापीठ ठरले आहे. तर पेकिंग युनिव्हर्सिटी आणि नानयांग टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, सिंगापूर (NTU) दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. क्यूएस आशिया रॅंकिंग टॉप १० मध्ये एकाही भारतीय विद्यापीठाचा समावेश नाही. क्यूएस एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२२ मध्ये ११७ भारतीय विद्यापीठांचा विचार करण्यात आला. यापैकी ७ जणांनी टॉप १०० मध्ये स्थान मिळवले. किमान १८ भारतीय संस्था आशियातील सर्वोच्च २०० संस्थांमध्ये आहेत. ज्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (IIT Mumbai) ४२ व्या क्रमांकावर आहे. आयआयटी मुंबईला १०० पैकी ७१ गुण आयआयटी मुंबईने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, संस्थेने १०० पैकी ७१ गुण मिळवले आहेत. IIT मुंबईने शैक्षणिक प्रतिष्ठेमध्ये ८१.४, एम्प्लॉयर रेप्युटेशनमध्ये ९६, फॅकल्टीमध्ये २३, आणि फॅकल्टी स्टुडंट रेशोमध्ये ४४.७ गुण मिळवले आहेत. क्यूएस आशिया रँकिंगमधील ११ श्रेणींमध्ये, पीएचडी कर्मचार्‍यांनी प्रादेशिक स्तरावर १८ रँकसह IIT मुंबईमध्ये सर्वात मजबूत योगदान दिले. क्यूएस आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२२ वि २०२१: टॉप ७ भारतीय विद्यापीठांची यादी १) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IITB) - ४२ वे स्थान (71 गुण). गेल्या वर्षी ३७ वा क्रमांक मिळाला होता. २) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली (IITD) - ४५ वे स्थान (६९.६ गुण). गेल्या वर्षीच्या तुलनेत ते दोन रँक वर आहेत. २०२१ मध्ये ते ४७ व्या क्रमांकावर होते. ३) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (IITM) ५८.८ गुणांसह ५४ व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी ते ५० व्या क्रमांकावर होते. ४) गतवर्षीप्रमाणे या वर्षीही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) ला ५६ वा क्रमांक (५८.१ गुण) मिळाला आहे. ५) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर (IIT-KGP) ५६ गुणांसह ६० व्या स्थानावर आहे. तर गेल्या वर्षी ते ५८ व्या क्रमांकावर होते. ६) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर (IITK) या वर्षी ६४ व्या (५० गुण) स्थानावर आहे. २०२१ च्या यादीत ते ७२ व्या क्रमांकावर होते. ७) दिल्ली विद्यापीठाने ७७ व्या क्रमांकासह (५०गुण) गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ स्थानांनी घसरण केली आहे. ते ७१ व्या क्रमांकावर होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Yt7LqA
via nmkadda