Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ८ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-11-08T11:43:42Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IIT मद्रासमध्ये कॅम्पस प्लेसमेंटचा नवीन विक्रम, मिळाल्या भरघोस ऑफर Rojgar News

Advertisement
Campus Placements: करोना प्रादुर्भावाच्या काळातही भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये(IITs) विक्रमी प्लेसमेंट होत आहेत. मंगळवारी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासने कॅम्पस प्लेसमेंटने २०२०-२१ मध्ये नवीन विक्रम केला आहे. येथे एकाच दिवसात २२ कंपन्यांनी १२३ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर दिल्या आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षावर नजर टाकली तर ही आकडेवारी खूपच जास्त आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात २० कंपन्यांनी १०२ जॉब ऑफर दिल्या होत्या. या वर्षी सर्वात मोठी भरती करणाऱ्यांमध्ये मायक्रोसॉफ्टचे नाव पुढे होते. त्यांनी सर्वाधिक १९ ऑफर दिल्या. तर बजाज ऑटोने १०, इस्रो-१०, अल्फोन्सो-९, आणि क्वालकॉमने ८ ऑफर दिल्या. प्लेसमेंटचा पहिला टप्पा ८ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यावर्षी १४४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पहिल्या टप्प्यात २५६ कंपन्यांनी नोंदणी केली असून त्या ४७२ प्रोफाइलसाठी भरती करणार आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुरकीच्या प्लेसमेंट्समध्ये आतापर्यंत ३९५ ऑफर देण्यात आल्या आहेत. तसेच अनेकजण निकालांची प्रतीक्षा करत आहे. ३५ मोठ्या कंपन्या प्लेसमेंटसाठी आयआयटी रुरकीकडे वळल्या आहेत. IIT रुरकीने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन एक्सप्रेस, अप्लाइड मटेरियल्स, सिस्को सिस्टम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सिट्रिक्स आर अँड डी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, डीबीआय ग्लोबल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ड्रीम ११, जग्वार लँडरोव्हर इंडिया, जेपी मॉर्गन सारख्या अनेक मोठ्या कंपन्या प्लेसमेंट ऑफर देण्यासाठी सहभागी झाल्या आहेत. तसेच एलएएम रिसर्स, एमटीएक्स ग्रुप., एनविदिया ग्राफीक्स, हारनेस आणि पायपल यांचा देखील समावेश आहे. त्याचप्रमाणे आयआयटी गुवाहाटीमध्येही प्लेसमेंट सुरू झाली आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट, गोल्डमन सॅच्स, क्वालक्वाम, टेक्सस इन्स्ट्रुमेंट्स, बजाज ऑटो, अमेरिकन एक्सप्रेस यांनी १ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या प्लेसमेंटमध्ये भाग घेतला आहे. प्लेसमेंट ड्राइव्ह सध्या सुरु असून आतापर्यंत ६९ जॉब ऑफर देण्यात आल्या आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wrPwOP
via nmkadda