Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ८ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-11-08T12:44:09Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NALCO Executive Recruitment 2021: नाल्को कंपनीत ८६ पदांवर भरती, त्वरित करा अर्ज Rojgar News

Advertisement
Executive Recruitment 2021:नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड, नाल्को ने (National Aluminium Company Limited, NALCO) विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. याअंतर्गत NALCO मार्फत डेप्युटी मॅनेजर, जनरल मॅनेजर, ग्रुप जनरल मॅनेजर, मॅनेजर, सीनियर मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर सह अन्य पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण ८६ पदे भरण्यात येणार आहेत. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात, ते अधिकृत वेबसाइट https://nalcoindia.com/ वर जाऊन संबंधित तपशील तपासू शकतात. या पदांवरील भरतीची प्रक्रिया सोमवार ८ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे. ही अर्ज प्रक्रिया ७ डिसेंबर २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. NALCO द्वारे जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशन नुसार डेप्युटी मॅनेजर ५२, जनरल मॅनेजर १२, ग्रुप जनरल मॅनेजर ३ आणि मॅनेजरच्या ७ पदांवर नियुक्ती केली जाईल. या व्यतिरिक्त सीनियर मॅनेजरची ७ आणि असिस्टंट मॅनेजरची ७ पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. जर अर्जात कुठली चूक झाली, किंवा खोटी माहिती असल्याचे आढळून आले तर अर्ज बाद केला जाईल. म्हणूनच या प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी अर्जदारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांची घोषणेच्या आधारे शॉर्टलिस्टिंग केली जाईल. याव्यतिरिक्त जर वैयक्तिक मुलाखतीवेळी कागदपत्रांची सत्यपडताळणी करताना कोणतीही खोटी माहिती आढळून आल्यास उमेदवाराला मुलाखतीसाठी परवानगी देण्यात येणार नाही. त्याचसोबत कोणतंही टीए/डीए दिलं जाणार नाही. उमेदवारांनी भरतीशी सबंधित माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर जावे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mRH34j
via nmkadda