Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २०, २०२१ WIB
Last Updated 2021-11-20T11:43:35Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IBPS तर्फे ४१३५ पीओ पदांची भरती, प्रवेशपत्र 'असे' करा डाऊनलोड Rojgar News

Advertisement
Admit Card 2021: आयबीपीएस पीओ भरती परीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिद्ध झाले आहे. इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनलने ( Institute of Banking Personnel Selection, IBPO) आपल्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड आवश्यक असणार आहे. पुढे देण्यात आलेल्या स्टेप्स डाऊनलोड करुन सोप्या पद्धतीने उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. PO Admit Card 2021: असे करा डाऊनलोड IBPS PO पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा. होमपेजवर 'पीओ/एमटीएससाठी ऑनलाइन पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा' असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर/रोल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिनवर क्लिक करा. तुमचे IBPS PO प्रवेशपत्र २०२१ तुमच्या स्क्रीनवर दिसेल. प्रवेशपत्र डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घ्या. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ४१३५ पदांची भरती केली जाणार आहे. प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर ११ डिसेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध असेल. त्यानंतर पोर्टलवरून लिंक काढून टाकली जाईल. आयबीपीएस पीओ परीक्षा ४ आणि ११ डिसेंबर २०२१ दरम्यान घेतली जाणार आहे. ऑनलाइन मुख्य परीक्षा जानेवारी २०२२मध्ये घेतली जाईल. ११ सहयोगी बँकांमधून आठ बँकांमधील एकूण ४,१३५ रिक्त आहेत (अजा-६७९, अज-३५०, इमाव-११०२, इडब्ल्यूएस-४०४, खुला-१६००). दिव्यांग उमेदवारांसाठी एकूण २१० पदं राखीव आहेत (एचआय-५८, ओसी-३७, व्हीआय-४८, आयडी-६७). ० पात्रता- १० नोव्हेंबर, २०२१ रोजी पदवी उत्तीर्ण ० वयोमर्यादा- १ ऑक्टोबर, २०२१ रोजी २० ते ३० वर्षं (इमाव-३३ वर्षांपर्यंत, अजा/अज- ३५ वर्षांपर्यंत, दिव्यांग-४० वर्षांपर्यंत). ० निवड पद्धती- कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस- ऑनलाइन परीक्षा (अ) प्रीलिमिनरी परीक्षा- १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ६० मिनिटं (इंग्रजी भाषा- ३० प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड- ३५ प्रश्न, रिझनिंग अॅबिलिटी- ३५ प्रश्न, वेळ प्रत्येकी २० मिनिटं) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची. (ब) मुख्य परीक्षा- १. रिझनिंग अँड कम्प्युटर अॅप्टिट्यूड- ४५ प्रश्न, ६० गुण, वेळ ६० मिनिटं; २. जनरल/ इकॉनॉमी/ बँकिंग अवेअरनेस- ४० प्रश्न, ४० गुण, वेळ ३५ मिनिटं; ३. इंग्रजी भाषा- ३५ प्रश्न, ४० गुण, वेळ ४० मिनिटं; ४. डेटा अॅनालिसीस अँड इंटरप्रिटेशन- ३५ प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटं; ५. इंग्रजी भाषेत पत्र लेखन आणि निबंध- २ प्रश्न, प्रत्येकी २५ गुण, वेळ ३० मिनिटं. ऑब्जेक्टिव्ह टाइप परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या ०.२५ गुण वजा केले जातील. (क) मुलाखत- ऑनलाइन मुख्य परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांची १०० गुणांसाठी मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लेखी परीक्षेतील गुण प्रसिद्ध केले जातील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oOG0Si
via nmkadda