TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

ICG Recruitment: इंडियन कोस्ट गार्डमध्ये भरती, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या Rojgar News

Recruitment 2021: भारतीय तटरक्षक दलामध्ये (indian Cost Guard) सहाय्यक कमांडंट (ग्रुप ए) या पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आहेत. सर्व पात्र उमेदवार आयसीजी ग्रुप ए भरती २०२१ (IGC Group A Recruitment 2021) साठी ६ डिसेंबर ते १७ डिसेंबर २०२१ पर्यंत अधिकृत वेबसाइट joinindiancoastguard.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे, भारतीय तटरक्षक दलात एकूण ५० रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ज्यामध्ये जनरल ड्युटीची ३० पदे, कमर्शियल पायलटची १० पदे, टेक्निकल (इंजिनिअरिंग) ६ पदे आणि टेक्निकल (इलेक्ट्रिकल) ४ पदांचा समावेश आहे. जनरल ड्यूटी आणि टेक्निकल ब्रांचसाठी, उमेदवाराचा जन्म १ जुलै १९९७ ते ३० जून २०२१ दरम्यान झालेला असावा. तर व्यावसायिक पायलट प्रवेशासाठी, उमेदवाराचा जन्म १ जुलै १९९७ ते ३० जून २००३ दरम्यान झालेला असावा. भारतीय तटरक्षक भरतीसाठी उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारावर निवडले जाणार आहे. उमेदवारांची प्राथमिक परीक्षा होईल. त्यानंतर अंतिम निवड केली जाईल. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार ICG भरती २०२१ साठी ६ डिसेंबर ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत अधिकृत वेबसाइट joinindiancoastguard.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अधिक तपशील देण्यात आला आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार, जनरल ड्युटी ब्रांचमधील भरतीसाठी, उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६० टक्के गुणांसह बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. व्यावसायिक पायलट प्रवेशासाठी, उमेदवार ६० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असावा. याशिवाय, उमेदवाराकडे डीजीसीएने जाहीर केलेला वैध व्यावसायिक पायलट परवाना असावा. तसेच टेक्निकल (इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रीकल) ब्रांचसाठी उमेदवाराकडे इंजिनीअरिंग डिग्री असणे आवश्यक आहे. उमेदवारांना अधिकृत नोटिफिकेशनमध्ये तपशील मिळू शकणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rmcshV
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या