Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १९, २०२१ WIB
Last Updated 2021-11-19T11:43:43Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ICSI CSEET नोव्हेंबर परीक्षेचा निकाल जाहीर, 'या' लिंकवरुन तपासा Rojgar News

Advertisement
CSEET : इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियातर्फे (Institute of Company Secretaries of India, ICSI) सीएसईईटी निकाल जाहीर करण्यात आला आहे. आयसीएसआयतर्फे नोव्हेंबर सत्राच्या कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट म्हणजेच ICSI परीक्षेच्या निकालाची लिंक अॅक्टीव्ह करण्यात आली आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. परीक्षा १३ आणि १४ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात आली. मुख्य परीक्षेच्या आदल्या दिवशी ICSI ने विद्यार्थ्यांना परीक्षा पॅटर्न समजण्यासाठी मॉक टेस्टचे आयोजन केले होते. यानंतर मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला बसलेले उमेदवार आपल्या नोंदणी क्रमांकाच्या मदतीने निकाल पाहू शकतात. यासाठी उमेदवारांना पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. ICSI CSEET Result 2021: असा तपासा निकाल उमेदवारांनी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट icsi.edu. वर जा. होमपेजवर 'CSEET नोव्हेंबरचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा' असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा. नोंदणी क्रमांकासह तुमच्याकडे मागितलेले क्रेडेन्शियल्स भरा आणि लॉगिन करा. तुमच्या स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील उपयोगासाठी निकालाची प्रिंट काढा. महत्वाची माहिती निकालासोबत प्रत्येक उमेदवाराच्या गुणांचा विषयवार तपशील ICSI द्वारे प्रसिद्ध केले जाईल. हा तपशील उमेदवारांना पोस्टाने पाठवला जाणार नाही. हा तपशील डाऊनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ICSI CSEET निकाल २०२१ च्या अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाइटवरील अपडेट पाहणे गरजेचे आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DArgfZ
via nmkadda