TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

एसएससी जीडी कॉन्स्टेबल प्रवेशपत्रासाठी प्रादेशिक वेबसाइटनुसार लिंक्स, येथे करा डाऊनलोड Rojgar News

Admit Card 2021: एसएससी कॉन्स्टेबल जीडी भरती परीक्षा १६ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. ही परीक्षा १५ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. उमेदवारांच्या परीक्षा वेगवेगळ्या तारखा आणि शिफ्ट्सवर सुरु आहेत. ज्यासाठी प्रवेशपत्रे एसएससीच्या प्रादेशिक वेबसाइटवर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात आली आहेत. परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रासह परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे. परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्राची प्रिंट घ्यावी. उमेदवार त्यांच्या प्रदेशाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन स्वत:च्या लॉगिनने प्रवेशपत्र डाउनलोड करा. प्रवेशपत्रावरील सर्व आवश्यक माहिती तपासा आणि त्याची प्रिंट काढा. ऑनलाइन प्रवेशपत्राच्या प्रिंट आऊटसोबतच परीक्षा केंद्रावर प्रवेशिका उपलब्ध असतील हे लक्षात ठेवा. कोणत्याही उमेदवाराला प्रवेशपत्र आणि वैध फोटो ओळखपत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. आयोगाच्या प्रादेशिक वेबसाइटची लिस्ट पुढे देण्यात आली आहे. एसएससी दक्षिण विभाग प्रवेशपत्र एसएससी ईशान्य विभाग प्रवेशपत्र एसएससी पश्चिम विभाग प्रवेशपत्र एसएससी मध्य विभाग प्रवेशपत्र एसएससी उत्तर पश्चिम विभाग प्रवेशपत्र एसएससी उत्तर विभाग प्रवेशपत्र एसएससी केरळ कर्नाटक विभाग प्रवेशपत्र या परीक्षेच्या माध्यमातून २५ हजार २७१ पदांची भरती केली जाणार आहे. आयोगाने उमेदवारांसाठी मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर केली आहेत. सर्व उमेदवारांना याचे पालन करणे बंधनकारक आहे. ही परीक्षा करोना प्रोटोकॉलचे पालन करुन घेतली जात आहे. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर ३० मिनिटे आधी पोहोचणे आवश्यक आहे. सर्व उमेदवारांना मास्क घालून केंद्रावर येणे बंधनकारक आहे. मास्क नसेल तर उमेदवारांना केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवार त्यांच्यासोबत पारदर्शक पाण्याची बाटली आणि सॅनिटायझर केंद्रावर घेऊन जाऊ शकतात. तसेच उमेदवारांना केंद्रावर प्रवेशपत्रासह फोटो असलेले अधिकृत ओळखपत्र देखील सोबत आणावे लागेल. रिक्त जागांचा तपशील या रिक्त पदासाठी जाहीर केलेल्या नोटीसनुसार एकूण २५ हजार २७१ पदांची भरती केली जाणार आहे. त्यामध्ये पुरुष हवालदार पदाच्या २२,४२४ तर महिला हवालदाराची २८४७ पदे भरली जाणार आहेत. बीएसएफमध्ये ७५४५, सीआयएसएफमध्ये ८४६४, एसएसबीमध्ये ३८०६, आयटीबीपीमध्ये १४३१, एआरमध्ये ३७८५ आणि एसएसएफमध्ये २४० जागा रिक्त आहेत. CRPF आणि NIA मध्ये एकही जागा रिक्त नाही. कमिशनद्वारे कॉन्स्टेबल (जीडी) परीक्षेचे आयोजन १६ नोव्हेंबर २०२१ पासून केले जाणार आहे. ही परीक्षा १५ डिसेंबर २०२१ पर्यंत वेगवेगळ्या नियोजित तारखांवर घेतली जाणार आहे. एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा २०२१ ऑनलाइन सीबीटी (कॉम्प्युटर आधारित परीक्षा) माध्यमातून घेतली जाणार आहे. अशी होईल निवड सर्व प्रथम लेखी परीक्षा (कॉम्प्युटर आधारित) होईल. उत्तीर्ण उमेदवारांना फिजिकल फिटनेस टेस्ट (PET) आणि फिजिकल मेजरमेंट टेस्ट (PST) साठी बोलावले जाईल. लेखी परीक्षेत जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग, जनरल नॉलेज आणि आणि जनरल अवेअरनेस, इलिमेंट्री मॅथ्स आणि इंग्रजी/हिंदी विषयांशी संबंधित प्रश्न विचारले जातील. चारही विभागातून २५-२५ प्रश्न विचारले जातील. सर्व विभाग प्रत्येकी २५ गुणांचे असतील. पेपरचा कालावधी ९० मिनिटांचा असेल. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केला जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3x4jkRV
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या