Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १०, २०२१ WIB
Last Updated 2021-11-10T11:43:55Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

INICET २०२२ जानेवारी सत्रासाठी प्रवेशपत्र जाहीर Rojgar News

Advertisement
INICET 2022: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ( All India Institute of Medical Sciences, AIIMS) द्वारे राष्ट्रीय महत्त्व संयुक्त प्रवेश परीक्षेचे (INICET Admit 2022) करण्यात आले आहे. हे प्रवेशपत्र एम्स, जीआयपीएमइआर पीजी परीक्षेच्या जानेवारी सत्रासाठी आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट aiimsexams.ac.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. आयएनआय सीईटी परीक्षा १४ नोव्हेंबरला होणार आहे. या परीक्षेची नोंदणी सप्टेंबरपासूनच सुरू झाली होती. २० ऑक्टोबर २०२१ ही परीक्षेसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख होती. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांकडे नोंदणी क्रमांक असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यापूर्वी त्यांचा नोंदणी क्रमांक त्यांच्यासमोर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उमेदवारांना बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. Admit Card: असे करा डाऊनलोड उमेदवारांनी सर्वप्रथम ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या अधिकृत वेबसाइट aiimsexams.ac.in ला भेट द्या. होमपेजवर, 'INI CET 2022 Admit Card' या लिंकवर क्लिक करा. एक नवीन विंडो उघडेल जिथे तुम्ही नोंदणी क्रमांक भरा आणि सबमिट वर क्लिक करा. INI CET प्रवेशपत्र २०२२ स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट डाउनलोड करा. उमेदवारांना बातमीखाली देण्यात आलेल्या थेट लिंकवरून देखील प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. INI CET प्रवेशपत्र २०२२ वर दिलेली सर्व माहिती अतिशय काळजीपूर्वक जाण्याचा सल्ला दिला जातो. प्रवेशपत्रात काही चूक आढळल्यास परीक्षा आयोजित करणारी संस्था, एम्सशी संपर्क साधा. आयएनआय सीईटी प्रवेशपत्र २०२१ हे परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. त्यामुळे प्रवेशपत्र सुरक्षित ठेवा आणि परीक्षेच्या दिवशी सोबत नेण्याची सूचना देण्यात आली आहे. परीक्षाकेंद्रावर प्रवेशपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HiJLrQ
via nmkadda