Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १०, २०२१ WIB
Last Updated 2021-11-10T12:44:47Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

JoSAA काऊन्सेलिंग २०२१: चौथ्या फेरीच्या जागा वाटपाचा निकाल जाहीर Rojgar News

Advertisement
Counseling 2021: तीन फेरीच्या सीट वाटपाच्या निकालानंतर, आता जॉइंट सीट अलॉकेशन अथोरिटीने (JoSAA) चौथ्या फेरीतील जागा वाटप निकाल जाहीर केला आहे. देशभरातील आयआयटी, एनआयटी, ट्रीपल आयटी, आयआयइटीएस सह सर्व केंद्रीय अनुदानित तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी यादी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट Josaa.nic.in वर यादी पाहता येणार आहे. उमेदवारांना जेईई मेन्स किंवा अॅडव्हान्स अॅप्लीकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करू शकतात आणि प्रवेशाचा स्टेटस तपासू शकतात. प्राधिकरणाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, निकालाची तारीख आणि वेळ आधीच जाहीर करण्यात आला. त्यानुसार संध्याकाळी ५ वाजता निकाल जाहीर करण्यात आला. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे. JoSAA च्या चौथ्या फेरीमध्ये निवडलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाइन रिपोर्ट करावा लागेल. यासोबतच ११ आणि १२ नोव्हेंबरला प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे. JoSAA चौथ्या फेरीची जागा वाटप यादी उमेदवारांची गुणवत्ता, ऑनलाइन अर्जामध्ये भरलेल्या निवडी आणि जागांची उपलब्धता या आधारावर तयार केली जाईल. JoSAA काऊन्सेलिंग २०२१ च्या वेळापत्रकानुसार ६ फेऱ्या आयोजित केल्या जातील. JoSAA Counseling 2021: असा तपासा निकाल निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम JoSAA ची अधिकृत वेबसाइट josaa.nic.in ला भेट द्या. त्यानंतर होमपेजवर, 'सीट वाटप निकाल - राउंड ४' लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा. लॉगिन करण्यासाठी तुमचा JEE मुख्य अर्ज क्रमांक, पासवर्ड आणि सिक्योरिटी कोड भरा. JoSAA काऊन्सेलिंग २०२१ साठी चौथ्या फेरीचा निकाल स्क्रिनवर दिसेल. निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा. JoSAA ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT) आणि इतर सरकारी अनुदानित तांत्रिक संस्था (GFTIs) मधील प्रवेशासाठी आयोजित केली जाते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3D5kiPR
via nmkadda